मुंबई : स्टाईल स्टेटमेंटच्या नावाखाली अनेकदा सेलिब्रिटी मंडळी अशा रुपात जगासमोर येतात जिथं पाहणारेही थक्क होतात. बरं, फॅशनच्या नादात काही सेलिब्रिटी तर हद्दच ओलांडतात. ठरलेली चौकट मोडीत काढताना त्या चौकटीला धक्काही लागणार नाही, याचंच परीक्षण करत जगासमोर येणाऱ्या एका अभिनेत्रीनं पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
फॅशन म्हटलं की ही अभिनेत्री कधीही कोणाचीही निराशा करताना दिसत नाहीत. यावेळी मेट गालाच्या रेड कार्पेटवरही तिचा असाच अंदाज पाहायला मिळाला.
ही अभिनेत्री म्हणजे ब्लेक लाईवली.(Blake Lively ) ब्लेक यंदा मेट गालाच्या रेड कार्पेटवर पती, Ryan Reynold याच्यासोबत आली. यावेळी तिच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
अत्यंत देखणं रुप, चेहऱ्यावर असणारं हास्य तिच्या सौंदर्यात सातत्यानं भर टाकत होतं. यावेळी तिनं रस्ट ब्राऊन ही शेड असणारा Atelier Versace tulle column dress घातला होता.
रंगीत हिरे, चामडंवजा कापड आणि टियारा, ओपेरा लेंथ ग्लोव्ज असा तिचा एकंदजर लूक होता. तिनं मेटच्या पायऱ्या चढतानाच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.
कारण, त्यावेळी तिनं ड्रेसला असणारा ओव्हरसाईज बो सोडला आणि त्यापासून एक लांबलचक निळ्याशार रंगाची टेल तिथं तयार झाली. तिनं ग्लोव्जही काढले आणि ड्रेसला शोभतील असेच ग्लोव्ज समोर आले.
न्यूयॉर्क शहरातील स्थापत्याला सलाम ठोकण्यासाठी म्हणून तिनं या लूकला पसंती दिली होती. यामधील प्रत्येक गोष्ट या शहराला अधोरेखित करताना दिसत होती.
भर कार्यक्रमात कपडे बदलत संपूर्ण जगाला थक्क करण्याचा अभिनेत्रीचा अंदाज तुम्हाला कसा वाटला ?