'ब्लॅकपिंक'च्या गाण्याने तोडला 'गंगनम स्टाईल'चा रेकॉर्ड

गाण्याने युट्यूबवर मिळवले सर्वाधिक व्ह्य़ूज 

Updated: Apr 8, 2019, 11:28 PM IST
'ब्लॅकपिंक'च्या गाण्याने तोडला 'गंगनम स्टाईल'चा रेकॉर्ड  title=

मुंबई : दक्षिण कोरियातील पॉप बँड 'ब्लॅकपिंक' सध्या सोशल मीडियाच्या वर्ळुता चांगलाच चर्चेत आला आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक कमी वेळात १० कोटी व्ह्यूज मिळवणारा हा एकमेव बँड ठरत आहे. मुख्य म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रचंड व्हायरल झालेल्या 'गंगनम स्टाईल' या गाण्याचा रेकॉर्डही 'ब्लॅकपिंक'च्या 'किल धीस लव्ह' या गाण्याने मोडला आहे. त्यामुळे पॉप विश्वात सध्याच चर्चा सुरु आहेत ती याच एका गाण्याची. 

दोन दिवस, चौदा तासांच्या कालावधीत 'ब्लॅकपिंक'च्या 'किल धीस लव्ह'  Kill This Love या गाण्याने हा विक्रम प्रस्थापित केला होता. अवघ्या चोवीस तासांमध्ये या गाण्याला ५६ कोटी व्ह्यूज मिळाले होते. एका दिवसात सर्वाधिक वेळा पाहिल्या गेलेल्या 'थँक्यू' या गाण्याचा विक्रमही  'ब्लॅकपिंक'च्या गाण्याने मोडला आहे. 

ही आहेत चोवीस तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळवणारी गाणी 

ब्लॅकपिंक- किल धीस लव्ह 
अरियाना ग्रांदे- थँक्यू, नेक्स्ट 
बीटीएस- आइडल
टेलर स्विफ्ट- लूक व्हॉट यब मेड मी डू 
एमिनेम- किलशॉट 

ब्लॅकपिंक विषयी थोडं... 

२०१६ मध्ये ब्लॅकपिंक बँड चर्चेत येण्यास सुरुवात झाली. हा एक महिलांचा बंड असून, जिसू, जेनी, लिसा आणि रोज या बँडमधील मुख्य सदस्य आहेत. २०१६ मध्येच या बँडने त्यांचा पहिला अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. ज्याला कोरियामध्ये बरीच लोकप्रियता मिळाली होती. २०१८ मध्ये याच बँडचं 'डू-डू-डू-डू' हे गाणं दक्षिण कोरियामध्ये युट्यूबवर सर्वाधिक वेळा पाहिलं गेलेलं गाणं ठरलं होतं.