मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत 'रक्षा बंधन' या चित्रपटात दिसणार आहे. पुढील महिन्यात 11 ऑगस्ट रोजी त्यांचा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. याशिवाय अक्षय कुमारकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ज्यात 'गोरखा' आणि 'OMG 2' सारख्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यापैकीच एक म्हणजे अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'राम सेतू' चित्रपट. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहेत.
यासोबतच नुसरत भरुचाही या चित्रपटात दिसणार आहे. अक्षयचा हा चित्रपट एक पौराणिक ड्रामा चित्रपट आहे, ज्याची निर्मिती अरुणा भाटिया आणि विक्रम मल्होत्रा यांनी केली आहे. मात्र भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त करत अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच, सुब्रमण्यम यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून अक्षय आणि त्यांच्या चित्रपटासाठी ट्विट केले आणि लिहिले की 'मी आणि माझे सहकारी वकील सत्य सभरवाल नुकसानभरपाईचा खटला करण्याचे ठरवले आहे '.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, 'माझे सहकारी अॅडव्होकेट सत्य सभरवाल यांनी भरपाईचा दावा केला आहे. मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडिया यांच्यावर राम सेतू चित्रपटातील चुकीच्या चित्रणामुळे झालेल्या नुकसानीसाठी दावा दाखल करत आहे.'
The suit for compensation has been finalised by my associate Satya Sabharwal Adv. I am suing Akshay Kumar, actor & Karma Media for damages cause by falsification in portrayal of the Ram Setu issue in their film for release.
— Subramanian Swamy (@Swamy39) July 29, 2022
याआधीही सुब्रमण्यम स्वामी यांनीही राम सेतूसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांनी न्यायालयाला इशारा दिला होता की, 'राम सेतू कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेशी निगडित आहे, त्यामुळे राम सेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करावे'. त्याचवेळी आता रात सेतूवर बनत असलेल्या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त करत आहे.
'RAM SETU': IN CINEMAS, *NOT* OTT... #RamSetu - starring #AkshayKumar - will release in *cinemas*, NOT on any digital platform, as speculated on social media... “#RamSetu will celebrate #Diwali 2022 in theatres, as committed," producer #VikramMalhotra sets the record straight. pic.twitter.com/YbI6IvkPJb
— taran adarsh (@taran_adarsh) June 17, 2022
या चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, यासाठी त्याने अक्षयवर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टपणे सांगितले. दुसरीकडे, चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याची घोषणा 2020 मध्ये झाली होती, त्याच वेळी त्याचे पहिले पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते. या वर्षी चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यंदाच्या वर्षी 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अक्षय कुमार आर्कियोलॉजिस्टची भूमिका साकारताना दिसणार आहे.