Nora Fatehi Birthday: किती तो Hotness! बॅकलेस ड्रेसमुळं नोराचा तोरा यंदा फेल, बर्थडे गर्ल कुठं फसली?

Happy Birthday Nora Fatehi : ज्या नोराने बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं, ती नोरा आता ट्रोल होताना दिसते. तिचा बोल्ड अंदाज अनेकांच्या नजरेत भरलाय.

Updated: Feb 7, 2023, 10:56 AM IST
Nora Fatehi Birthday: किती तो Hotness! बॅकलेस ड्रेसमुळं नोराचा तोरा यंदा फेल, बर्थडे गर्ल कुठं फसली? title=
Nora Fatehi

Nora Fatehi Trolled on Birthday : बॉलिवूडची 'दिलबर गर्ल' नोरा फतेही (Nora Fatehi) आज प्रसिद्धीच्या उंचीवर आहे. मात्र, कोणे एकेकाळी फक्त 5 हजार घेऊन भारतात आलेल्या नोराचा आजवरचा प्रवास संघर्षमय राहिलाय. नोराच्या गाण्याने (Nora Fatehi New Song) संपूर्ण भारताला येड लावलं. नोराने आपल्या करिअरला ( Nora Fatehi) शून्यातून सुरुवात केली, मात्र आज ती नव्या उंचीवर पोहोचली आहे. आज नोरा तिचा वाढदिवस (Happy Birthday Nora Fatehi) साजरा करत आहे. मात्र, वाढदिवसादिवशी तिला ट्रोलिंगचा (Nora Fatehi Troll) सामना करावा लागत आहे.

नोरा फतेही तिच्या हॉट मूव्ह (Nora Fatehi Hot Pics) आणि निर्दोष फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अशातच आता नोराचा एक व्हिडिओ (Nora Fatehi Hot Video) सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या व्हिडिओमध्ये नोरा समुद्रकिनाऱ्यावर (Nora Fatehi on the beach) दिसत आहे. एका ड्रेसमध्ये नोराचा तोरा पहायला मिळतोय. उंच स्लिट गाउनसह बॅकलेस लाईम कलरचा सॅटिन ड्रेसमध्ये नोरा दिसली होती.

आणखी वाचा - Viral trending video : आणि म्हैस Nora Fatehi सारखी सेम नाचू लागली; व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

Nora Fatehi का होतेय ट्रोल?

नोरा फतेही व्हिडीओमध्ये  (Nora Fatehi New Video) अनेक फ्रेम्समध्ये तिची बॅकलेस (Backless Top) फ्लाँट करताना दिसत आहे. त्यामुळे तिची बोल्ड अंदाज अनेकांच्या नजरेत भरलाय. कानात मोठे झुमके घातलेल्या नोराला मात्र, ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. अनेकांनी तिला कमेंट करत निशाण्यावर घेतलंय. नोरा आणि इम्रान हाश्मीला सोबत एखादा सिनेमा केला पाहिजे, असं म्हणत तिला डिवचण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांनी केलाय.

पाहा Video - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Koimoi.com (@koimoi)

नोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यात चर्चेत असते. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering) नोरा अडचणीत आली होती आणि ती अधिकाऱ्यांसोबत साक्षीदार म्हणून काम केलं. तिने अलीकडेच सहकारी जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) विरुद्ध मानहानीचा दावाही केला. त्यामुळे देखील मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळालं होतं.

दरम्यान,एका मुलाखतीत नोराने कोणाचंही नाव न घेता आणि वैयक्तिक अनुभव सांगितले. एखादा पुरुष सतत गायब होत असेल तर हा सर्वांत मोठा इशारा आहे. ब्रेकअपनंतर सर्वांत नीच गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगणं. ही सर्वांत नीच बाब असू शकते, असं नोरा म्हणाली होती. त्यानंतर आता तिचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.