पिफमध्ये प्रदर्शित झाला मराठमोळा चित्रपट ‘डायरी ऑफ विनायक पंडित’

Pune International Film Festival 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यापैकी 140 चित्रपट हे दाखवण्यात येणार आहेत. त्यापैकी एक ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ हा चित्रपट आहे. 

Updated: Feb 6, 2023, 01:19 PM IST
पिफमध्ये प्रदर्शित झाला मराठमोळा चित्रपट ‘डायरी ऑफ विनायक पंडित’  title=

Pune International Film Festival : यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला (Pune International Film Festival) अखेर सुरुवात झाली आहे. हा महोत्सव 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. जानेवारीमध्ये होणारा हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे चित्रपट प्रेमींची उत्सुकता ही प्रचंड वाधली होती. मात्र, सिने प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. 2 फेब्रुवारी पासून हा महोत्सव सुरु झाला आहे. या महोत्सवात 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यापैकी 140 चित्रपट हे दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवात दाखवण्यात येणारे सर्व सिनेमे A+ ग्रेडचे असणार आहेत. 

दाखवण्यात येणाऱ्या 140 चित्रपटांमधला एक म्हणजे 'डायरी ऑफ विनायक पंडित' (Diary Of Vinayak Pandit) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा ही मयूर करंबकळीकर, दुर्गेश काळे आणि कुलदीप दगडे यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्जर्शन मयुर करंबळीकरने केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती ही आदित्य देशमुख यांनी केली आहे. या चित्रपटात अविनाश खेडेकर, पायल जाधव, सुहास शिरसाट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठीप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, अभय जोधपूरकर, जयदीप वैद्य, प्रियांका बर्वे आणि मंगेश बोरगावकर यांनी गाणी गायली आहेत. निरंजन पेडगावकर यांनी या चित्रपटाला संगीतबद्ध केलं आहे. यासोबतच आनंदी विकास यांनी देखील या चित्रपटाला संगीत दिलं आहे. 3 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. 

हेही वाचा : Urfi Javed ला पूर्ण कपड्यात पाहून बसेल धक्का, पण आरशात पाहाल तर...

'डायरी ऑफ विनायक पंडित' या चित्रपटात  70 ते 80 चा काळ कसा होता हे अनुभवायला मिळणार आहे. खरंतर हा मराठी चित्रपट सृष्टीच्या गौरवशाली इतिहासात चित्रपट भर घालणारा असल्याचा विश्वास चित्रपटाच्या टीम कडून व्यक्त करण्यात आला आहे. हा चित्रपट अत्यंत कमी साधन आणि सामग्रीच्या बळावर चित्रपट बनवला. इतकंच काय तर चित्रपटसृष्टीत नवख्या असणाऱ्या पुण्यातील सहकाऱ्यांनी निळून या चित्रपटाची निर्मिती केली. मराठी चित्रपट सृष्टीला साजेसे काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत टीमने व्यक्त केले आहे. यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अखेर सुरुवात झाली आहे. हा महोत्सव 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. जानेवारीमध्ये होणारा महोत्सव पुढे ढकलल्याने चित्रपट प्रेमींची उत्सुकता ताणली गेली होती. दरम्यान, महोत्सवाला सुरवात झाली आहे.