शेवटी तो क्षण आलाच; बिपाशा बासूकडे लग्नाच्या 6 वर्षानंतर गोड बातमी

बिपाशाच्या पतीचं हे तिसरं लग्न होतं. त्यामुळं सुरुवातीला या जोडीला बरंच ट्रोलही केलं गेलं होतं....   

Updated: Jul 29, 2022, 03:48 PM IST
शेवटी तो क्षण आलाच; बिपाशा बासूकडे लग्नाच्या 6 वर्षानंतर गोड बातमी  title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने चाहत्यांना आनंदाची बातमी दिल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू देखील आई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. रिपोर्टनुसार बिपाशा प्रग्नेंट आहे आणि अभिनेत्री लवकरचं आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर करणार असल्याची माहिती मिळत आहे. पिंक व्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू आई-वडील होण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र, करण किंवा बिपाशा या दोघांनीही अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान, बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरचं पाळणा हलणार असल्याची माहिती चाहत्यांना मिळताचं दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण जेव्हा करण आणि बिपाशा स्वतः चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करतील तेव्हा त्यांचा आनंद शिगेला पोहोचेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या जवळच्या सूत्राने सांगितल्यानुसार, हे दोन सुपरस्टार लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाची घोषणा करणार आहेत. यामुळे करण-बिपाशा आई-वडील होण्यासाठी खूप आनंदी आणि उत्सुक आहेत. 

अशी झाली बिपाशा आणि करणच्या नात्याची सुरुवात 
एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2016 मध्ये करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू यांनी लग्न केलं. आत लग्नाच्या 6 वर्षांनंतर बिपाशा आणि करण आई-वडील होणार आहेत.