माधुरीनं साथ सोडताच संजुबाबाची वाईट अवस्था; ते दिवस आठवूनही येईल रडू

आज संजय दत्तचा 63 वा वाढदिवस आहे. 

Updated: Jul 29, 2022, 03:39 PM IST
माधुरीनं साथ सोडताच संजुबाबाची वाईट अवस्था; ते दिवस आठवूनही येईल रडू  title=

मुंबई : नुकताच 'शमशेरा'मध्ये (Shamshera) इन्स्पेक्टर शुद्ध सिंगच्या भूमिकेत दिसणारा संजय दत्त आज 29 जुलै रोजी 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. संजय दत्त हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पत्नी मान्यतासोबत संजय त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. संजय दत्तनं जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा त्याचं नावं जवळपास सगळ्याच अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले होते. पण सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे बॉलिवूडची धक्क धक्क गर्ल माधुरी दीक्षितसोबतच्या त्याच्या अफेअरची. त्यांचा ऑन स्क्रिन रोमान्स हा ऑफ स्क्रिन रोमान्सच्या चर्चा तर नेहमीच रंगायच्या... सिनेसृष्टीतील अनेकांनी ते दोघे ते दोघं मित्र नाहीत असं म्हटलं होतं. 

1993 मध्ये, त्यांच्या कथित अफेअरबद्दल बरेच काही लिहिले जात होते. एका अफेअरच्या बातम्या सतत चर्चेत राहिल्यानंतर संजय दत्तला माधुरीची माफी मागावी लागली. एका मुलाखतीत त्याने घडलेला प्रकार सांगितला. संजय दत्त म्हणाला, अरेअरची चर्चा साजनच्या काळात सुरु झाली. खरं तर जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा ती केनियामध्ये खेल चित्रपटाचं शूटिंग करत होती. मग जेव्हा आम्ही साजन चित्रपटासाठीनंतर शूट करणार होतो, मी तिला भेटलो आणि तिची माफी मागितली. कारण तिचा स्वतःचा कोणताही दोष नसताना तिचं नाव घेतलं जात होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे त्यांच्या लग्नाच्या चर्चांविषयी बोलताना संजय म्हणाला, तिच्याशी लग्न करण्यासाठी आमच्यात काहीतरी असलं पाहिजे. डीएनए मधील एका वृत्तानुसार, त्याच्या पहिल्या पत्नीला हे माहित होते की ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. तर त्याच्या पत्नीनं हे देखील सांगितलं की 'त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला एखाद्या व्यक्तीची गरज असते ज्यावर तो भावनिकरित्या अवलंबून राहू शकतो. जणू तो माधुरीवर अवलंबून होता. आता तो त्याला सोडून गेला आहे, तो आता एक विखुरलेला माणूस होणार आहे.'

एका मुलाखतीत, जेव्हा माधुरीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा संजयनं ते सगळं खोटं असल्याचं म्हटलं. ' माझ्यावर तिच्या विधानाचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडला नाही. मी तिचा सहकलाकार आहे आणि मी तिच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. माझ्या सहकलाकारांसोबत माझा चांगला रॅपो असनं गरजेचं आहे, मग ती माधुरी किंवा श्रीदेवी असू शकते. उदाहरणार्थ, गुमराहच्या पहिल्या काही दिवसांत मी कम्फर्टेबल नव्हतो, कारण श्रीदेवी कशी आहे हे तुम्हाला माहीत आहे. ती कोणाशी जास्त बोलत नाही आणि मला तिच्याशी बोलायचे होतं. त्यामुळे माधुरीने जे काही सांगितलं त्याचा मला फारसा त्रास झाला नाही.' त्यानंतर माधुरी आणि संजय 2019 मध्ये कलंकमध्ये दोघांनी स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.