'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक; हजारो रुपयांचा चुना

ऑनलाइन फसवणुकीचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. 

Updated: Jul 16, 2022, 05:04 PM IST
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक; हजारो रुपयांचा चुना title=

मुंबई : ऑनलाइन फसवणुकीचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. खरंतर, आता लोकप्रिय टीव्ही सीरियल 'नागिन 6' ची अभिनेत्री महेक चहल देखील ऑनलाइन फसवणुकीची शिकार झाली आहे. ऑनलाइन नोंदणीच्या बहाण्याने मेहकच्या खात्यातून हजारो रुपये काढण्यात आले आहेत. अलीकडेच या अभिनेत्रीने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

10 रुपयांत साइटवर नोंदणी केली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहेक चहलने पोलिसात तक्रार दाखल करताना सांगितलं की, तिला गुरुग्रामला पार्सल पाठवायचं होतं. या कारणास्तव, 12 जुलै रोजी, मेहकने सोशल मीडियावर ऑनलाइन कुरिअर पाठविण्याचे पर्याय शोधले. मेहकने सांगितलं की, त्यानंतर तिला फोन आला. तिने सांगितलं की, तिला कुरिअर कंपनीतून फोन आहे.

अभिनेत्रीने पोलिसांना सांगितलं की, कॉलरने ज्या साइटबद्दल सांगितलं त्यावर मी 10 रुपयांची नोंदणी केली. मला ऑनलाइन कुरियर पाठवण्यासाठी पैसे द्यावे लागले. त्यानंतर जेव्हा ती व्यक्तीने मेहकशी पैसे भरण्याबाबत बोलली तेव्हा त्याने गुगल पे मागितलं, मात्र पेमेंट झालं नाही.

20 सेकंदात उडाले महकेचे पैसे
या सगळ्या प्रोसेसनंतर जेव्हा पेमेंट झालं नाही तेव्हा त्या व्यक्तीने मेहकला लिंक पाठवली आणि सांगितलं की, तुम्हाला 20 सेकंदात ओटीपी मिळेल मग पेमेंट होईल. मात्र, मेहककडे लिंक येताच तिच्या खात्यातून 49 हजार रुपये गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचं जेव्हा मेहकला समजलं तेव्हा तिने लगेचच आपली उर्वरित कार्ड आणि बँक खाती फ्रीज केली. मेहकने असंही सांगितलं की सायबर शाखेने तिला मदत करण्यास विलंब लावला नाही. लगेच पुढील प्रक्रीया सुरु केली. एफआयआरनंतर लगेचच तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली.