मुंबई : बिग बॉस ११ चा पाचवा भाग म्हणजे भांडणाचा दिवस ठरला. दिवसाची सुरुवात अर्शी खान आणि ज्योतीच्या भांडणाने झाली. दोघांमधील मतभेद झाल्यानंतर कदाचित आजच्या एपिसोडमध्ये तरी काही मनोरंजन पाहायला मिळेल असा विचार प्रेक्षकांनी केला असेल पण तसे झाले नाही. शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यामधील वाद एवढा वाढला की दोघेही हमरातुमरीवर आले.
विकास गुप्ताच्या मस्करीमुळे या भांडणाला सुरुवात झाली. त्याने शिल्पा शिंदेच्या कपड्यांवर जाणूनबुजून चहा सांडली आणि शिल्पा संतापली. दोघांनी एकमेकांपेक्षा खूप वाईट सुनावले. खूप वेळानंतर कशीतरी या दोघांची भांडण शमली. त्यानंतर घरवाल्यांनी अंधारकोठडीकडे जाण्याची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.अर्शी खान, शिल्पा शिंदे आणि आकाश ददलानी यांना अंधारकोठडीत पाठविण्यासाठी निवडले गेले. इतरांचा निर्णय येणे अद्याप बाकी आहे. आतापर्यंत आकाश हा ददलानी हाच तिथे गेला आहे.
बिग बॉस सिझन ११ मध्ये शिवानी दुर्गा, ज्योती कुमारी, सपना चौधरी, जुबैर खान, टीव्ही फेम हिना खान, शिल्पा शिंदे, बेनफाश शोनवाल्ला, विकास गुप्ता, हितेन तेजवानी आणि प्रियांका शर्मा यांचा समावेश आहे.