पॉर्नोग्राफीचा खुलासा होताचं स्वतःला वाचण्यासाठी राज कुंद्राकडून मोठा निर्णय, पण....

कोणता होता राज कुंद्राचा तो निर्णय?

Updated: Jul 27, 2021, 07:41 AM IST
पॉर्नोग्राफीचा खुलासा होताचं स्वतःला वाचण्यासाठी राज कुंद्राकडून मोठा निर्णय, पण.... title=

मुंबई : पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पॉर्नोग्राफी  प्रकरणी रोज नवे खुलासा समोर येत आहे. या प्रकरणाची सुरूवात झाली फेब्रुवारी 2021 साली. तेव्हापासून पोलिसांकडून सतत चौकशी आणि तपास सुरू आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच कसून चौकशी समोर येत आहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून एक  मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

फेब्रुवारीमध्ये जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा राज कुंद्राने त्याचा मोबाईल फोन बदलला. राजला अटक केल्यानंतर या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे.  राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांना मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. दोघांची कोठडी 27 जुलैपर्यंत सुनावण्यात आली आहे. रिपोर्टनुसार या प्रकरणावर अद्याप आणखी तपासणी केली जावू शकते. 

रिपोर्टनुसार, अश्लील प्रकरणात राज कुंद्राची आर्थिक आणि इतर अनेक कागदपत्रांतून सखोल चौकशी होणार आहे. चौकशीत राज पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं कळत आहे. दरम्यान 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. 

ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्राला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. तर काल अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली. राजला काल कोर्टात हजर केल्यानंतर अधिक चौकशीसाठी कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.