BIG NEWS: फार्महाऊस वर जाताना Salman Khanला संपवण्याचा कट?..बिष्णोई गँगचा प्लॅन B उघड

पनवेलमध्ये  कपिल पंडित, संतोष  जाधव, दीपक मुंडी आणि आणखी दोन शूटर्स भाड्याने घर घेऊन राहत होते, जिथे जवळच सलमान खानचं फार्महाउस देखील आहे .सलमानच्या फार्महाउसची बराच वेळ रेकी करण्यात आली 

Updated: Sep 15, 2022, 06:29 PM IST
BIG NEWS:  फार्महाऊस वर जाताना Salman Khanला संपवण्याचा कट?..बिष्णोई गँगचा प्लॅन B उघड  title=

Salman Khan murder plan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची (Salman Khan)पनवेलच्या फार्म हाऊसवर हत्येचा कट उघड झालाय. पंजाबचा सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वी(sidhu moose wala) सलमानच्या हत्येचा प्लॅन बी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईनं आखल्याचं समोर

आलंय. सलमान गेल्या काही वर्षांपासून बिष्णोईच्या निशाण्यावर आहे. दोन वेळा सलमानच्या हत्येचा कट बिष्णोईनं आखला होता. मात्र त्याचा दोन्ही वेळेस कट उधळण्यात पोलिसांना यश आलं.

आणखी वाचा: एक रुपया तुम्हाला बनवेल श्रीमंत.. हजारोंच्या किमतीत विकली जातेय 'ही' एक रुपयाची नोट

 गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान (Salman Khan) चर्चेत आहे. अनेक चाहत्यांच्या मनात घर केलेल्या सलमानच्या जीवा धोका असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.(salman khan murder plan while going to farmhouse by bishnoi gang)

अभिनेत्याच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (sidhu moose wala) मृत्यूनंतर सलमान खानच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली.  (Salman's security increased)

आणखी वाचा: trending शिंग असणाऱ्या सापाचा Video व्हायरल..पाहा यामागचं सत्य..

सिद्धीहू मुसेवाला हत्याकांडाआधी  लॉरेन्स बिष्णोई ने पुन्हा एकदा सलमान खानला  मारण्याचा प्लान B तयार केला होता या प्लॅन ला  गोल्डी बराड़ ,कपिल पंडित  (लॉरेंस बिश्नोई गैंग चा एक शूटर ज्याला हल्लीच नेपाळ बॉर्डरवरून पकडण्यात आलं होत ) यशस्वी करणार होते.

पनवेलमध्ये  कपिल पंडित, संतोष  जाधव, दीपक मुंडी आणि आणखी दोन शूटर्स भाड्याने घर घेऊन राहत होते, जिथे जवळच सलमान खानचं फार्महाउस देखील आहे .सलमानच्या फार्महाउसची बराच वेळ रेकी करण्यात आली .  सलमानवर अटॅक  करण्याच्या हेतूने आलेल्या या शूटर्सकडे  पिस्टल, कारतूस सुद्धा होते 

आणखी वाचा:Shocking news Sushant Singh Rajput चा मर्डरच? या व्यक्तीचा खळबळजनक खुलासा

पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सलमान खान गँगस्टर्सच्या निशाण्यावर आहे. सिद्धू मूसवाला प्रकरणात अटक करण्यात आलेला सहावा शूटर कपिल पंडित याने चौकशीत खुलासा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोईने  पंडितला सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं.