'खैके पान बनारस वाला' गाण्याचं हे व्हर्जन पाहून बिग बी देखील हैराण

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'डॉन' मधील सुपरहिट गाणे 'खैके पान बनारस वाला' ची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. 

Updated: Aug 12, 2021, 12:15 PM IST
'खैके पान बनारस वाला' गाण्याचं हे व्हर्जन पाहून बिग बी देखील हैराण title=

मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या चित्रपटांबरोबरच, त्याच्या पोस्टही अनेकदा चर्चेत असतात. बिग बींच्या पोस्ट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. अलीकडेच अमिताभ यांची एक नवीन पोस्ट खूप चर्चेत आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'डॉन' (DON) मधील सुपरहिट गाणे 'खैके पान बनारस वाला' ची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या पोस्टमधील विशेष गोष्ट म्हणजे व्हिडिओमधील दृश्ये 'खैके पान बनारस वाला' मधील आहेत पण त्याच्या गाण्यात एक ट्विस्ट देण्यात आला आहे. या व्हिडिओला एका इंगजी गाण्याचं रुप देण्यात आलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 
हा व्हिडिओ शेअर करत बिग बींनी एक कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये अमिताभ यांनी लिहिले, "किया था क्या, क्या हो गया !! त्यांच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्रिटींनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि नात नव्या नवेली नंदा यांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. महानायकाच्या या पोस्टला आतापर्यंत 1.6 दशलक्षाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.