'टी सिरीज'च्या भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा दाखल

महिलेने केलेल्या  आरोपांनंतर  भूषण कुमारवर होणार कारवाई?  

Updated: Jul 16, 2021, 04:07 PM IST
'टी सिरीज'च्या भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा दाखल  title=

मुंबई : बॉलिवूड विश्वातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता देखील अशीचं एक धक्कादायक घटना समोर येत आहे. 'टी सिरीज' कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर एका 30 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला. टी सिरीजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप पिडितेने केला आहे. गेली तीन वर्ष भूषण कुमार महिलेवर अत्याचार करत असल्याचं देखील समोर येत आहे.

गीतकार गुलशन कुमार यांनी नावारूपाला आणलेली टी सिरीज ही कंपनी गेल्या काही दिवसात अनेकदा वादात सापडली आहे. आता तर त्यांच्या मुलावर बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. भूषण कुमारविरोधात डि.एन.नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

2017 ते 2020 पर्यंत भूषण कुमार बलात्कार करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. शिवाय बाहेर कोणाला सांगितल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.