मुंबई : मनोरंजन विश्वातून (Entertainment) वाईट बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभी जी घर पर हैं' (Bhabi Ji Ghar Par Hai) मधील अभिनेता जितू गुप्ता (Actor Jitu Gupta) यांचा मुलगा आयुष गुप्ताचं (Ayush Gupta Death) निधन झालयं. वयाच्या अवघ्या 19 वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. तरुण मुलाच्या निधनामुळे अभिनेत्याला खूप मोठा धक्का बसला आहे. कॉमेडीयन सुनील पालने (Comedian Sunil Pal) याबाबतची माहिती दिली आहे. (bhabi ji ghar par hai fame actor jitu gupta son ayush gupta death at age of 19)
कॉमेडियन सुनील पालने आयुषचं निधन झाल्याची माहिती फेसबूकवरुन शेअर केली. जीतू गुप्ता यांनी फेसबूकवरुन आपल्या मुलाचा फोटो शेअर करुन त्याचं निधन झाल्याचं जाहीर केलं. यानंतर सुनील पालने जीतू गुप्ताची पोस्ट रिशेअर करत ही वाईट बातमी सर्वांपर्यंत पोहचवली.
अभिनेता जीतू गुप्ताने एक दिवसापूर्वी आपल्या मुलाचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये आयुष हॉस्पिटलच्या बेडवर दिसत होता. "मुलाची प्रकृती गंभीर आहे आणि तो कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही", असं अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला होता.
"मुलाबाबतची पोस्ट वाचल्यानंतर सर्वांनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केले. मात्र तुम्हाला विनंती आहे की, माझ्या मुलाच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा आणि देवाकडे आशीर्वाद मागा, कारण यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मी अजिबात बोलण्याच्या स्थितीत नाही", असं अभिनेत्याने लिहिलं होतं.