मुंबई : छोट्या पडद्याची क्वीन चित्रपट आणि मालिका निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे एकता आणि तिच्या आईच्या अडचणीतच मोठी वाढ झाली आहे. हे वॉरंट एकताच्या XXX सीजन 2 या वेब सीरिज विरोधात जारी करण्यात आलं आहे. बेगुसराय कोर्टाने एकता आणि तिची आई शोभा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. या मालिकेत दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृश्यांबाबत गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसराय (Bihar's Begusarai Court) न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सैनिकांचा अपमान (Insulting Soldiers) केल्याप्रकरणी आता न्यायालयानं एकता आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
वास्तविक, या वेब सीरिजमध्ये सैनिकाच्या पत्नीची अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती, ज्यासाठी गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसरायमध्ये एकता कपूरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकतावर आरोप होता की तिनं वेब सीरिजमध्ये सैनिक आणि त्यांच्या पत्नींना चुकीच्या पद्धतीनं दाखवलं आहे, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी बेगुसराय कोर्टानं एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना समन्स पाठवून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. (Begusarai Court Issues Arrest Warrant For Ekta Kapoor And Shobha Kapoor For Insulting Soldiers)
एक वर्षापूर्वी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंभू कुमार यांनी हा गुन्हा दाखल केला होता. शंभू कुमारनं सांगितलं की, या मालिकेत दाखवण्यात आलेल्या सीनमुळे तो खूप दुखावला गेला आहे. ते म्हणाले की, भारतीय सैनिक स्वतःला धोक्यात घालून देशाची सेवा करतात. अशा स्थितीत त्यांच्याकडे आदरानं पाहिले पाहिजे, पण इथं उलटंच घडत आहे. मालिकेत भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे.
त्याचवेळी एकतानेही या प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. एकतानं सांगितलं की, तिला या प्रकरणाची माहिती मिळताच तिनं वेब सीरिजमधून हा सीन काढून टाकला होता. यासोबतच एकतानं आपली चूक मान्य करत लोकांची माफीही मागितली आहे. XXX वेब सिरीज Alt Balaji वर प्रदर्शित झाली.