'या कारणामुळे मुलगी श्वेताची आठवण आम्ही काढत नाही', स्वत: जया बच्चनकडून खुलासा

हल्लीच जयाबच्च यांनी कुटुंबाबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Updated: Jan 27, 2022, 02:07 PM IST
'या कारणामुळे मुलगी श्वेताची आठवण आम्ही काढत नाही', स्वत: जया बच्चनकडून खुलासा title=

मुंबई : फिल्मी दुनेयेती सेलिब्रिटींचे लाखो चाहते आहेत. हे चहाते आपले आवडते सेलिब्रिटी काय करतात? कुठे जातात याची सर्व माहिती आवडीने जाणून घेतात. एवढेच काय तर ते घरी कसं आयुष्य जगतात हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायला फार आवडते. बहुतेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावरती ऍक्टीव्ह असतात. त्यामुळे ते त्यांच्याबद्दल काहीना काही सोशल मीडियावरती पोस्ट करत असतात. अमिताभ बच्चन हे बॉलिवूड विश्वातील मोठे नाव आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली आहे. अजूनही लाखो चाहत्यांच्या मनात त्यांनी घर केलं आहे. त्यामुळे ते आपल्या खासगी आयुष्यात काय करतात हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायला आवडते.

हल्लीच जयाबच्च यांनी कुटुंबाबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत जया बच्चन यांनी सांगितलं की, त्यांच्या घरात आता ते त्यांची मुलगी श्वेताला कधीही मिस करत नाही.

यामुळे लोकांना प्रश्न पडले आहेत की, जया बच्चन यांनी असं वक्तव्य का केलं असावं? स्वत:च्या मुलीबद्दल त्या असं का म्हणाल्या असाव्यात?

तर आम्ही तुम्हाला सांगतो की, त्यांनी हे वक्तव्य वेगळ्याच कारणावरुन केलं आहे. खरंतर त्यांनी सुन ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडची सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय ही आता बच्चन कुटुंबाची सुन आहे. तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत देखील उत्तम बॉन्डिंग आहे. एका मुलाखतीदरम्यान सासू जया बच्चन यांनी वक्तव्य केलं की, ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची लाडकी सून आहे. अमिताभ तिला अगदी आपल्या मुलीप्रमाणे वागवतात. श्वेतीची जागा ऐश्वर्याने घेतली आहे.

पुढे जया बच्चन म्हणाल्या. ती अमिताभ यांना कधीही त्याची सुन असल्याची जाणीव करु देत नाहीत, ती त्यांची मुलगीच आहे आणि तिने अमिताभ बच्चन यांच्या मुलीची म्हणजेच श्वेताची जागी घेतली आहे. ज्यामुळे श्वेताची आम्हाला आठवण येत नाही. 

ऐश्वर्या आणि अमिताभची बॉन्डिंग पब्लिक प्लेसमध्ये देखील चांगलीच पाहायला मिळाली आहे. अनेक अवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्या अमिताभ यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसली आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नानंतर जया बच्चन करण जोहरच्या चॅट शोमध्ये पोहोचल्या, जिथे त्यांनी ऐश्वर्याचे जोरदार कौतुक केले.