ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा, कशी? पाहा व्हिडिओ

या शिक्षकाला त्याच्या समोर आलेल्या आव्हानाला यश मिळणार?

Updated: Jan 6, 2022, 12:56 PM IST
 ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा, कशी? पाहा व्हिडिओ title=

मुंबई :  ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत सगळ्यांची वेगवेगळी मत आहेत. पण जेव्हा शहरातील शिक्षक पहिल्यांदा ग्रामीण भागात जाऊन तेथील मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते,  हे टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील लोकांचे शिक्षणासंदर्भातील विचार आता वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. 

या शिक्षकाला त्याच्या समोर आलेल्या आव्हानाला यश मिळणार, का त्यांची भ्रमनिराशा होणार, हे 'बदली' प्रदर्शित झाल्यावरच कळेल. 'बदली' ही आठ भागांची एक अनोखी वेबसिरीज 15 जानेवारीपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'बदली' या वेबसिरीजचे लेखन, दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले असून मानसी सोनटक्के या 'बदली'ची निर्मिती केली आहे. या वेबसिरीजचे कथा पटकथा आणि संवाद नितीन पवार यांचे असून छायांकन वीरधवल पाटील यांनी केले आहे. तर संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे .