ऐश्वर्या राय बच्चन आणि 'कटप्पा'ची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ऐश्वर्या राय बच्चनव्यतिरिक्त अमिताभ बच्चनही चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

Updated: Apr 19, 2019, 09:51 AM IST
ऐश्वर्या राय बच्चन आणि 'कटप्पा'ची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  title=

मुंबई : सुपरहिट चित्रपट 'बाहुबली'मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रभाससह 'कटप्पा'ची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराजनेही लोकांच्या मनात आपली खास जागा बनवली आहे. सत्यराजने साकारलेल्या 'कटप्पा'ची संपूर्ण देशात वर्षभराहून अधिक काळ त्याच्याच नावाची चर्चा होती. सत्यराजबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. 'बाहुबली' फेम सत्यराज आता ऐश्वर्या राय बच्चनसह स्क्रिन शेअर करणार आहे. ऐश्वर्या राय बच्चन तिच्या आगामी चित्रपटात सत्यराजसोबत पाहायला मिळणार आहे. 

रजनीकांत और अक्षय कुमार की फिल्म '2.0' में नजर आएंगी ऐश्वर्या राय? हो गया खुलासा...

'बॉलिवूड लाइफ'ने दिलेल्या वृत्तानुसार मणिरत्नम यांनी त्यांच्या आगामी बिग बजेट 'पोन्निनी सेल्वम' चित्रपटात या साऊथ स्टारसोबत एन्ट्री केली आहे. 'पोन्निनी सेल्वम' या चित्रपटात सत्यराज ऐश्वर्या रायच्या पतिची भूमिका साकारणार आहे. ऐश्वर्या राय बच्चनव्यतिरिक्त अमिताभ बच्चनही चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी चित्रपटासाठी बिग बी आणि ऐश्वर्या या दोघांनाही विचारण्यात आलं आहे. परंतु या चित्रपटासाठी बिग बी काय उत्तर देणार ते निश्चित नसल्याचं सांगण्यात येत आहे. मणिरत्नम यांचा बिग बजेट, मल्टीस्टारर चित्रपट एका तमिळ गोष्टीवर आधारित आहे. चित्रपटात ऐश्वर्या एका राजकुमारीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारी एका राजाशी लग्न करते परंतु ती राणी असल्याच्या तिच्या ताकतीचा गैरवापर करण्यास सुरुवात करते. 

#MeToo कैंपेन पर खुलकर बोलीं ऐश्वर्या राय, कहा- हमें सपोर्ट करना चाहिए

साऊथ अभिनेता सत्यराजने 'कटप्पा'च्या भूमिकेतून अनेक प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख बनवली. 'बाहुबली'मधील 'कटप्पा'ची भूमिका अतिशय साहसी, सत्तेप्रती ईमानदार अशी दाखवण्यात आली होती. 'बाहुबली द बिगनिंग'नंतर 'बाहुबली द कन्क्लूजन'च्या प्रदर्शनापर्यंत संपूर्ण देशात कटप्पाने बाहुबलीला का मारला? हा प्रश्न मोठ्या चर्चेचा विषय बनला होता. आता 'पोन्निनी सेल्वम'मधून सत्यजित काय कमाल करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.