मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या घटस्फोटाच्या चर्चांना प्रचंड उधाण आलेलं असतानाच तिच्या आईकडून निकसोबतच्या नात्याबाबत मोठं वक्तव्य करण्यात आलं. बऱ्याच सेलिब्रिटी त्यांच्या घटस्फोटापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संकेत दिले होते. प्रियांकानंही तसंच काहीसं करत तिच्या नावातून पतीचं आडनाव हटवलं.
बस्स, पुढे काय... पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रियांका निक विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला.
पण, अखेर खरी गोष्ट समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियांका आणि निकनं हे सारं एका शोच्या प्रमोशनसाठी केलं.
निक आणि त्याचे भाऊ मिळून एका शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला अले आहेत. त्यासाठीच हा सारा घाट घातला गेल्याचं म्हटलं गेलं.
प्रियांका बाळाचं प्लॅनिंग करतेय ?
एकिकडे प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच दुसरीकडे प्रियांतकाने शोमध्येच गरदोरपणाबाबत मोठं वक्तव्य केलं.
निकच्या भावांचं उदाहरण देत, आम्ही एकमेव जोडी आहोत ज्यांना अजुन मुलं नाहीत. त्यामुळे आज मी याबाबत बोलताना फार उत्सुक आहे.
'सॉरी निक मला हे सांगावं लागेल.... ' असं म्हणत प्रियांकानं शोवर सर्वांचीच उत्सुकता ताणून धरली.
पुढे तिनं हीच उत्सुकता शिगेला पोहोचल्यावर, '... आम्ही प्लानिंग करत आहोत की.... आज रात्री आम्ही .... खूप मद्यपान करणार आणि सकाळी झोपणार' असं प्रियांका म्हणाली.
प्रियांकाचं हे वक्तव्य पाहता स्पष्ट होत आहे की, सध्यातरी ती बाळाबाबत फार गंभीर नाही. त्यामुळं येत्या काळात या जोडीकडे 'गुडन्यूज' नाही हेच खरं.