एकमेकांच्या मिठीत जुन्या आठवणींत रमले आयुष्यमान आणि भूमि

 आयुष्यमान खुराना आणि भूमि पेडणेकर आठवणीत रमले आहेत. 

Updated: Sep 2, 2018, 08:15 AM IST
एकमेकांच्या मिठीत जुन्या आठवणींत रमले आयुष्यमान आणि भूमि  title=

मुंबई : बॉलीवुड दिग्दर्शक आर.एस.प्रसन्ना यांचा 'शुभ मंगल सावधान' त्या रिलीजला शनिवारी एक वर्ष पूर्ण झालंय. या औचित्यात यातील कलाकार आयुष्यमान खुराना आणि भूमि पेडणेकर आठवणीत रमले आहेत. भूमिने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहत आयुष्यमान, मुदित आणि सुंगधा यांचे आभार मानले. आनंद एल. राय आणि आर.एस.प्रसन्ना यांचेही तिने आभार मानले. सर्व टेक्निशियन आणि 'शुभ मंगल सावधान'च्या संपूर्ण टीमचे धन्यवाद असेही तिने पोस्टमध्ये लिहिलं.

 

@ayushmannk, Mudit and Sugandha forever.. Thank you @aanandlrai, @rs.prasanna, @hiteshkewalya for giving us this experience. @anujdhawan13, @cypplofficial, @erosnow, @sandymeranaam #kanupriya, all the Ads and technicians, I miss my Shubh Mangal Saavdhan family. #1yearofshubhmangalsaavdhan

A post shared by Bhumi Pednekar (@psbhumi) on

आगामी सिनेमा 

आयुष्यमानने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत 'नेहमी प्रेम आणि उत्साहासाठी उभा राहिलोय' असे लिहिले. या पोस्टसोबतच सर्व कलाकार आणि टीम मेंबर्सने  'शुभ मंगल सावधान'ला वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. 'सोन चिरैया' या आगामी सिनेमात भूमि दिसणार आहे तर सान्या मल्होत्रासोबत 'बधाई हो' या सिनेमात आयुष्यमान खुराना दिसणार आहे.

पहिल्यांदाच एकत्र

'सोन चिरैया' या सिनेमात भूमि एका दरोडेखोराच्या भूमिकेत दिसणार आहे.

भूमिचा रोल दमदार आणि दुर्लक्षित महिलेचा आहे.  'सोन चिरैया' सिनेमा चंबल येथील डाकूंवर आधारित आहे. यामध्ये सुशांत सिह राजपूतही दरोडेखोरांच्या भूमिकेत दिसणार आहे. सुशांत आणि भूमि पेडणेकर दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसत आहेत. भूमि पेडणेकर एक उभरती अभिनेत्री असून अभिनयात येण्याआधी ती यश राज बॅनरसाठी सहायक दिग्दर्शकाचे काम करत होती.