सलमानबाबत कतरिना असं काही म्हणाली की...

'भारत'च्या चित्रीकरणावेळी सलमानसोबत कोणताही विचित्र क्षण आला नाही.

Updated: Feb 20, 2019, 11:25 AM IST
सलमानबाबत कतरिना असं काही म्हणाली की... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दबंग खान सलमान दोघेही त्यांच्या आगामी 'भारत'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चेनंतर पुन्हा ही जोडी मोठ्या पडद्यावर येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. येत्या ईदला प्रदर्शित होणारा 'भारत' हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे. 'भारत'च्या सेटवर पहिल्याच दिवशी सलमानने कतरिनाला पाहिल्यावर काय प्रतिक्रिया दिल्या याबाबत स्वत: कतरिनाने खुलासा केला आहे. 

'चित्रपटासाठी माझं नाव निश्चित झाल्यानंतर सलमानने मला कोणताही कॉल केला नाही. तो याबाबत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही आणि हेच खरं आहे. मी 'भारत' चित्रपटासाठी होकार कळविला त्यानंतरही त्याने मला कोणत्याही प्रकारचा कॉल केला नसल्याचं' कतरिनाने सांगितलं. 'डीएनए'ने दिलेल्या वृत्तनुसार, कतरिनाने पहिल्याच दिवशी 'भारत'च्या सेटवरील सलमानसोबतचा तिचा अनुभव सांगितला. 'पहिल्या दिवशी 'भारत'च्या सेटवर मला कोणाचं काय चाललं आहे याबबात काहीच कल्पना नव्हती. त्याचवेळी तिथे सलमान आला, त्याने कतरिना हाक मारली आणि कोणत्याही प्रकारची वेगळी प्रतिक्रिया न देता त्याने कामाला सुरूवात केली. त्यानंतर मलाही सगळं ठीक आहे असं वाटलं'. 

'सलमानच्या स्वभावाचा काहीही नेम नाही. तो कोणत्याही क्षणी काहीही करू शकतो त्यामुळे त्याच्यासोबत काम करायला मजा येते. 'भारत'च्या चित्रीकरणावेळी सलमानसोबत कोणताही विचित्र क्षण आला नसल्याचं' कतरिनाने सांगितलं. 

'भारत' चित्रपटासाठी प्रमुख अभिनेत्री म्हणून प्रियंका चोप्राच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. परंतु प्रियंकाने चित्रपटातून माघार घेतल्यानंतर शेवटच्या क्षणी कतरिना कैफचं नाव निश्चित करण्यात आलं. अली अब्बास जफर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'भारत' येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.