बोनी कपूर यांनी केले श्रीदेवींचे अस्थिविर्सजन...

श्रीदेवींनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये साधारणपणे ३०० सिनेमांत काम केले आहे. 

Updated: Mar 9, 2018, 08:06 AM IST
बोनी कपूर यांनी केले श्रीदेवींचे अस्थिविर्सजन... title=

मुंबई : श्रीदेवींनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये साधारणपणे ३०० सिनेमांत काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि अदांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मॉम हा श्रीदेवींचा शेवटचा सिनेमा ठरला.

बाथटबमध्ये बुडून अचानक मृत्यू

दुबईत कौटुंबिक लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवींचा तिथेच बाथटबमध्ये बुडून अचानक मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इमामात अंत्यसंस्कार झाल्यावर बोनी कपूर यांनी त्यांचे अस्थिविसर्जन केले. त्याचबरोबर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली.

बोनी कपूर यांच्यासोबत ही मंडळी देखील उपस्थित

यावेळी बोनी कपूर यांच्या सोबत त्यांचा लहान भाऊ अनिल कपूर देखील होता. तसंच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अमर सिंग देखील तेथे पोहचले.

हरिद्वारमध्ये अस्थिविसर्जन

बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारीला मुंबईत निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाबरोबरच चित्रपटसृष्टीलाही जबर धक्का बसला. २८ फेब्रुवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर बोनी कपूर यांनी हरिद्वारमध्ये श्रीदेवींचे अस्थि विसर्जन केले.