Ashok Saraf - Rohini Hattangadi : नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ 14 जून 2024 रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मा.श्री. अशोक सराफ आणि मा.श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न झाला. ह्या सोहळ्याला अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार साहेब, नाटयसंमेलनाध्यक्ष मा.डॉ. जब्बार पटेल, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शशी प्रभू, उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.ना.श्री. उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.मोहन जोशी, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.अशोक हांडे, पोलीस आयुक्त मा.श्री. विवेक फणसळकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच ह्या सोहळ्यात प्रायोगिक 8 पारितोषिके, व्यावसायिक 14 पारितोषिके आणि नाट्य परिषदेकडून देण्यात आलेली 13 पारितोषिके अशी एकूण 35 पारितोषिके प्रदान करण्यात आली.
शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य कलेचा जागर महोत्सवमध्ये अंतिम फेरीत बालनाट्य, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, एकपात्री, नाट्य अभिवाचन, एकांकिका ह्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे सादरीकरण झाले.
हेही वाचा : 'मोदीजी महिलांच्या बाजूने...' इंटरनेटवर तुफान व्हायरल होणाऱ्या Melodi व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया
नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी गणेश तळेकर, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रशांत जोशी, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी दिपाली घोंगे, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी शशांक लिमये, गुणी रंगमंच कामगार विजय जगताप, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी संजय देवधर (वृत्तपत्र- देवदूत), बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी गोविंद गोडबोले, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी अभिनय, कल्याण, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी प्रणित बोडके, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी अशोक ढेरे, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी सुनील बेंडखळे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी श्याम आस्करकर, तसेच नाट्य परिषदेच्या शाखेचे विनामूल्य काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी स्व.रितेश साळुंके यांची निवड करण्यात आली होती.