Arun Govil Loksabha Election : रामायण या मालिकेतील राम म्हणजेच अरुण गोविल हे आता राजकारणात उतरणार आहेत. अरुण गोविल हे मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपनं अरुण गोविल यांना मेरठ मधील तिकिट दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरठमधून सलग तीन वेळा खासदार राहिलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकिट भाजपनं रद्द करुण ते अरुण गोविल यांना दिलं आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून अरुण गोविल यांच्या नावाची चर्चा होती. अखेर आता अरुण गोविल यांनी स्वत: चं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
मेरठमधून सलग तीन वेळा खासदार राहिलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट भाजपने अखेर रद्द केले आणि रामायण या टीव्ही मालिकेतील राम अरुण गोविल यांना लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले. सुमारे तीन आठवडे अरुण गोविल यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी स्थानिक नेत्यांकडून राजेंद्र अग्रवाल यांच्याबाबत सातत्याने दबाव येत होता. हॅट्ट्रिक करणाऱ्या राजेंद्र अग्रवालच्या जागी अरुण गोविलला का मैदानात उतरवण्यात आलं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, येथेही जातीचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. अरुण गोविल हेही अग्रवाल आहेत.
अरुण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. अरुण गोविल या पोस्टमध्ये म्हणाले की,भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर जो विश्वास आणि त्यांच्या जनतेच्या सेवेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. 'जय श्री राम'
अरुण गोविल यांचं मेरठशी मोठं नातं आहे. अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1952 ला मेरठच्या अग्रवाल कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश गोविल आहे. त्यांचे वडील हे नगर निगमच्या जल-कल विभागात इंजिनियर होते. अरुण गोविल यांच्या आईचं नाव शारदा देवी होतं. शारदा देवी एक गृहिणी होत्या.
हेही वाचा : कंगना रणौतला उमेदवारी; भाजपच्या 5 व्या उमेदवार यादीत मोठा उलटफेर
अरुण गोविल यांना पाच भाऊ आणि दोन बहिणी आहेत. अरुण यांचं पूर्ण शिक्षण हे मेरठच्या मेरठ कॉलेच आणि चौधरी चरण सिंह विश्वविद्यालयातं झआलं. त्यानंतर त्यांनी करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबईत आले. अरुण गोविल मुंबईत बराच काळ त्यांचे भाऊ विजय गोविल यांच्यासोबत राहत होते. त्यांच्याजवळ दोन पर्याय होते, एक की ते त्यांच्या भावाला त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करतील. दुसरा म्हणजे त्यांची वहिणी तबस्सुमप्रमाणे कला क्षेत्रात पुढे जातील. हा पर्याय त्यांच्यासाठी फार कठीण असला तरी त्यांनी त्याचीच निवड केली.