मुंबई : IIFA अवॉर्ड्स २०१८ प्रसारीत झाल्यानंतर त्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पुरस्कार सोहळ्यातील एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात इव्हेंटमधली सर्व दिग्गजांचे डोळे पाणावले आहेत.
IIFA सोहळ्यात श्रीदेवींना मॉम सिनेमासाठी सर्वोतृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार देण्यासाठी अनिल कपूर मंचावर उपस्थित होता. त्यावेळेस अनिल कपूरने सांगितले की, श्रीदेवी सिनेसृष्टीतील सर्वात उत्तम अभिनेत्री होती.
हा पुरस्कार स्वीकारताना बोनी कपूर अत्यंत भावूक झाले. उपस्थितांचे डोळेही पाणावले. पण एक खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच श्रीदेवींच्या आठवणीत अर्जुन कपूरचे पापण्या ओलावल्या.
अर्जुन कपूरला पहिल्यांच असे भावूक झालेले पाहिले. बोनी कपूर यांनी सांगितले की, ''मी यावेळेस अत्यंत भावूक झालो आहे. जीवनातील प्रत्येक क्षण, सेकंद मी अजून फिल करतो. अजूनही श्रीदेवी आसपास आहे, असेच वाटते. मला नाही माहित की मी काय आहे. मी सर्वांना हेच सांगेन की, तुम्ही माझी मुलगी जान्हवी, अर्जुन कपूरची बहिण हिला श्रीदेवीप्रमाणेच प्रेम द्या.''