.... म्हणून मीडियावर भडकली अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. दोघांनीही फॅन्स आणि मीडियापासून लपून इटलीमध्ये लग्नाची गाठ बांधली. विरूष्काचं लग्न सिक्रेट ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. मात्र मीडियामध्ये या लग्नाची खूपच चर्चा झाली.   

Updated: Mar 9, 2018, 03:30 PM IST
.... म्हणून मीडियावर भडकली अनुष्का शर्मा  title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. दोघांनीही फॅन्स आणि मीडियापासून लपून इटलीमध्ये लग्नाची गाठ बांधली. विरूष्काचं लग्न सिक्रेट ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. मात्र मीडियामध्ये या लग्नाची खूपच चर्चा झाली.   

दोन ग्रॅन्ड रिसेप्शन्स  

विराट आणि अनुष्का या जोडीने इटलीमध्ये लग्न केले असले तरीही त्यांनी भारतामध्ये दोन ग्रॅन्ड रिसेप्शन दिली आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये आयोजित ग्रॅन्ड रिसेप्शनमध्ये बॉलिवूड कलाकार, मित्र मंडळी आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.  

मीडियावर भडकली अनुष्का शर्मा  

मीडियामध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडीबददल खूप चर्चा रंगली होती. मात्र कोणत्याही प्रकारचा पर्सनल आयुष्याबाबतचा इंटरव्हू दिलेला नाही असे म्हणत एका नामांकित मीडियाने काही माहिती प्रसिद्ध केल्याने अनुष्का मीडियावर भडकली आहे.  

 

अनुष्का शर्माने ट्विटरच्या माध्यमातून तिची नाराजी व्यक्त केली आहे.  

नव्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये अनुष्का शर्मा 

अभिनेत्री अनुष्का शर्मा 'झिरो' आणि 'सुई धागा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. 'झिरो' या सिनेमात अनुष्का शाहरूखसोबत तर 'सुई धागा' मध्ये वरूण धवनसोबत अनुष्का रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. नुकताच अनुष्काचा 'परी' हा चित्रपट रीलिज झाला आहे.