विराट कोहलीमुळे अनुष्का शर्मा झाली ट्रोल?

काय म्हणाले नेटीझन्स? 

विराट कोहलीमुळे अनुष्का शर्मा झाली ट्रोल? title=

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या संपूर्ण संघासोबत लंडनमध्ये आहे. भारताच्या उच्चआयोगाने या टीमसोबत डिनर पार्टी ठेवली होती. या दरम्यान विराट कोहली त्याच्या पत्नीसोबत म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत दिसला. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ट्विटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये टीम इंडिया खेळांडूसोबत अनुष्का शर्मा देखील दिसत आहे. या फोटोत अनुष्काने मिंट रंगाचा ट्रेडिशनल ड्रेस घातला आहे. 

बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी प्रश्न उभे केले आहेत. टीम इंडियासोबत अनुष्काचा फोटो कशाला? असा प्रश्न विचारला जाऊ लागला? कारण तिथे कोणत्याही इतर खेळाडूची पत्नी तिथे दिसत नव्हती. तसेच काहींनी उप कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या लांब उभं राहण्याबद्दल देखील आक्षेप नोंदवला. कारण अजिंक्य रहाणे अगदी शेवटच्या रांगेत उभा होता. 

तर दुसऱ्या युझरने विचारलं की, विराटची पत्नी पहिल्या रांगेत आणि उप कॅप्टन शेवटच्या रांगेत हा कोणता प्रकार आहे?