मुंबई : प्रत्येक भावा-बहिणीसाठी रक्षाबंधनाचा सण खास असतो. पण सण म्हटलं की नटणं, थटणं आलंच. रोजच्या धावपळीत या सणावारांनाच तर नटण्याची संधी मिळते. यंदा तर रक्षाबंधन रविवारी आल्याने महिलांना नटायला पुरेसा वेळ मिळणार आहे.
या खास सणाला कसे तयार व्हायचे, काय ड्रेसअप करायचा असा विचार करताय? मग सेलिब्रेटींचे हे काही हटके लूक्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.
रक्षाबंधनासाठी काही इंडियन वेस्टर्न ट्राय करु इच्छिता? तर मग बॉलिवूड स्टार्सची ही ड्रेसिंग स्टाईल तुम्हाला नक्कीच मदत करेल.
सिंपल स्टायलिश लाईट रंगाची प्रिंटेड साडीही तुम्हाला खास लूक देईल.
साडीची प्रचंड आवड असल्यास किंवा त्यात काही वेगळे ट्राय करण्याचा विचार करत असल्यास साडीवर तुम्ही असा बेल्डही घालू शकता.