मर्यादेपेक्षा छोट्या कपड्यांमध्ये Anushka Sharma, विराटने व्हिडीओ शूट केल्यानंतर...

अत्यंत छोट्या कपड्यांमध्ये अनुष्का शर्मा, विराटने व्हिडीओ शूट केल्यानंतर सर्वत्र खळबळ  

Updated: Jun 20, 2022, 08:14 AM IST
मर्यादेपेक्षा छोट्या कपड्यांमध्ये Anushka Sharma, विराटने व्हिडीओ शूट केल्यानंतर... title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटात लग्न केल्यानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. फक्त नात्यामुळे नाही, तर विरुष्का लोकीचा ज्याप्रकारे सांभाळ करतात त्यामुळे देखील त्यांचं कौतुक होतं. पण आता विराट आणि अनुष्का वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. 

सध्या अनुष्काचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा मुलगी वामिकासोबत आनंदात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

अनुष्का शर्माचा ऑरेंज कलरचा बिकिनी लूक व्हायरल झाला. त्याचवेळी, आता अभिनेत्री त्याच मोनोकिनीत सायकल चालवताना दिसत आहे. यावेळी अनुष्काची मुलगी वामिका देखील मागे बसली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीचा हा व्हिडिओ विराट कोहलीने शूट केल्याचं अनुष्काच्या हसण्यावरून स्पष्ट होते. खुद्द अनुष्काने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अनुष्काचा हा व्हिडिओ नेटिझन्स प्रचंड लाइक आणि शेअर करत आहेत.

अनुष्काच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अनुष्का शर्मा लवकरच 'चकडा एक्स्प्रेस' सिनेमात दिसणार आहे. सिनेमा झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. झुलन ही भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे. 

जानेवारी 2022 मध्ये अनुष्का शर्माने सिनेमाचा टीझर शेअर केला होता. अनुष्काचा आगामी सिनेमा 2 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.