मुलगी राशा थडानीच्या बॉलिवूड डेब्यूवर रवीना टंडनचं मोठं वक्तव्य म्हणाली, मला नकोय...

रवीना टंडन बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून प्रसिद्ध आहे.

Updated: Jun 19, 2022, 11:35 PM IST
मुलगी राशा थडानीच्या बॉलिवूड डेब्यूवर रवीना टंडनचं मोठं वक्तव्य  म्हणाली, मला नकोय... title=

मुंबई : रवीना टंडन बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून प्रसिद्ध आहे. या वयात रवीना जितकी सुंदर आणि ग्लॅमरस दिसते, तितक्या आजच्या हिरोईन्स देखील दिसत नाही. रवीना टंडनच्या सौंदर्याचे आजही लोकं चाहते आहेत. इतकंच नाही तर यावेळी रवीनाचे लकी स्टार्सही उंचीवर आहेत. ती नुकतीच KGF Chapter 2 या सुपरहिट चित्रपटात दिसली होती.

रवीना टंडनची मुलगी राशा टंडन देखील ग्लॅमरच्या बाबतीत तिच्या आईपेक्षा कमी नाही. राशा अनेकदा तिची आई रवीना टंडनसोबत स्पॉट होते. जिथे तिची स्टाइल पाहून लोकं तिच्या प्रेमात पडतात. रवीनाचे चाहते राशाला चित्रपटात पाहण्यासाठी आतुर आहेत. अशा परिस्थितीत रवीनाने नुकतंच तिच्या मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल सांगितलं.

रवीना टंडनने नुकतंच सांगितलं की, मुलगी राशाच्या पदार्पणाबद्दल तिला काय वाटतं. इन्स्टंट बॉलीवूड नावाच्या पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रिपोर्टर अभिनेत्रीला विचारतो, "आता राशाची बॉलिवूड पदार्पणाची काही योजना आहे का?". ज्यावर रवीना टंडन म्हणते, "अजून तरी काही नाही. किंवा ती कधीच याविषयी यावर बोलली नाही. म्हणूनच आम्ही आता वाट पाहत आहोत".

रिपोर्टर पुढे विचारतो, "तिला चित्रपटात यायचं असेल तर तिला यावं असं वाटतं का?" यावर अभिनेत्री म्हणते, "मला नको आहे.  पण आजच्या काळात आम्ही नाही ईच्छूक. ही मुलं आणि त्यांचं जीवन आहे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ते त्यांना हवं ते करू शकतात. आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो.