'झिम्मा 2' च्या निमित्तानं अकुंश चौधरीची खास पोस्ट; रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे म्हणाल्या...

Ankush Chaudhari on Jhimma: 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सध्या याची उत्सुकता आता संपली आहे. अभिनेता अकुंश चौधरीनंही यावेळी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरही गाजतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 25, 2023, 08:54 PM IST
'झिम्मा 2' च्या निमित्तानं अकुंश चौधरीची खास पोस्ट; रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे म्हणाल्या...  title=
ankush chaudhari shares a post on jhimma 2 wishing the entire team

Ankush Chaudhari on Jhimma: 'झिम्मा 2' हा चित्रपट काल 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. यावेळी अनेक लोकप्रिय मराठी सेलिब्रेटींनीही सध्या या चित्रपटाला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अभिनेता अकुंश चौधरी याच्या पोस्टची चर्चा आहे. त्यानं 'झिम्मा 2' ला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत आणि सोबतच सुंदर अशी पोस्टही शेअर केली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या या पोस्टची जोरात चर्चाही रंगलेली आहे. यावेळी त्यानं आपल्या मित्रांना खूप गोड शुभेच्छा दिल्या आहेत. अकुंश हा नेहमीच प्रत्येक चित्रपटासाठी प्रोत्साहन देतो त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा असते. नव्या मराठी चित्रपटालाही तो कायमच सहकार्य करतो. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. आता प्रेक्षकांची उत्सुकता संपली असून काल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावेळी अंकुशनं सर्वांना शुभेच्छा देत म्हटलं आहे की,'''झिम्मा 2' कमाल आणि धम्माल अविष्कार... सगळ्याजणी एकापेक्षा एक... हसवतात आणि रडवतात सुद्धा... शेवटी खूप काही सांगून जातात... खूप प्रेम... UNO UNO UNO... झिम्मा 2'''. अशी पोस्ट त्यानं नुकतीच शेअर केली आहे. यावेळी अनेकांनी त्याच्या पोस्ट खाली कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे त्याचीही चर्चा आहे. यावर्षी अंकूश चौधरी याचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या या चित्रपटाची बरीच चर्चा होती. चित्रपटही बराच गाजला. 

हेही वाचा : VIDEO: वय वर्षे 97! वयस्कर आजीचा अ‍ॅडव्हेन्चर; साडी नेसून केलं पॅराग्लायडिंग, आनंद महिंद्रा म्हणतात...

इंदू आजीच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सर्वांचे रियूनियन जमले आहे. यावेळीही कबीरनं टूरच्या आयोजन केले आहे. निर्मला, वैशाली, मीता, तान्या, मनाली, इंदू, कृतिका, अॅलिस्टर अशा सर्वांचच हे रियूनियन आहे. यावेळी या चित्रपटातून एक नवं भावविश्व हे प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. निर्मिती सावंत, सुहास जोशी, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर अशी तगडी स्टारकास्ट यावेळी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2021 मध्ये झिम्माचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. या चित्रपटानं चित्रपटगृहात 100 दिवसही पुर्ण केले होते. आता या नव्या आणि फ्रेश सिनेमाची प्रेक्षकांचा चांगलीच पर्वणी मिळाली आहे.