Katrina Kaif faced Death : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कोणताही चित्रपट असो, डान्स असो किंवा अभिनय सगळं परफेक्ट करण्यासाठी ओळखली जाते. ती ज्या प्रकारे डेडिकेशन देते ते पाहून तर सगळेच तिचे फॅन होतात. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी फक्त तिनं हिंदी भाषेचे धडे घेतले नाही तर त्यासोबत अॅक्शन सीन्स आणि डान्स देखील शिकला. कतरिना ही जवळपास सगळ्याच चित्रपटांमध्ये अॅक्शन करताना दिसते. सध्या तिचे 'टायगर 3' या चित्रपटातील अॅक्शन सीन्स चर्चेत आहेत. या चित्रपटासाठी स्टंट करत असताना तिनं मृत्यूला खूप जवळून पाहिल्याचं तिनं सांगितलं आहे.
कतरीनाला अनेकदा अॅक्शन सीन्स करताना जखमा किंवा दुखापत झाली आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कतरिनानं सांगितलं की एकदा अशी वेळ आली की तिनं मृत्यूला खूप जवळून पाहिलं. सोशल मीडियावर सध्या कतरिना याविषयी सांगत असलेला एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत कतरिना बोलताना दिसली की 'मी एकदा एका हॅलीकॉप्टरमध्ये होती आणि त्याची काहीतरी बिघाड झाला. हॅलीकॉप्टर अचानक खाली पडू लागला. त्या क्षणी मला असं वाटलं की देवा हा माझा शेवट आहे. माझा जीव जाणार आणि मला अजूनही आठवण आहे की त्या क्षणी मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होती आणि ती म्हणजे मला आशा आहे की माझी आई ठीक राहिल.'
कतरिना कैफच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'टायगर 3' या चित्रपटात सध्या दिसते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटानं आता पर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर 275 कोटींचा आकडा पार केला आहे. तर कतरिनाचा ‘मेरी क्रिसमस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कतरिनासोबत विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख नुकतीच पुढे ढकलण्यात आली आहे.
हेही वाचा : VIDEO : 'या' स्टार किडची एन्ट्री होताच; पापाराझींनी केलं रणबीर कपूरकडे दुर्लक्ष
चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवर वक्तव्य केलं की चित्रपटाचा ओपनिंग बॉक्स ऑफिस चांगला असावा यासाठी तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. सोशल मीडियावर निर्मात्यांनी पोस्ट शेअर करत सांगितलं की आम्ही या चित्रपटाला खूप प्रेमानं बनवलं आहे आणि उत्कटतेने बनवलं आहे, प्रत्येक चित्रपट निर्मात्या जसा करतो तसं जर बॅक टू बॅक चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि 2023 च्या शेवटचे दोन महिने पॅक आहेत. त्यामुळे आम्ही हा चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.