मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम त्यांच्या हटके लूकमुळे, गोड आवाजामुळे तर कधी राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण आता त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्या एखाद्या खास दिवसाचं औचित्य साधत सोशल मीडियावर स्वतःच्या गोड आवाजात व्हिडिओ प्रदर्शित करत असतात. आज देखील त्यांनी महिला दिनाच्या मैक्यावर महिलांवर आधारित एक गाणं प्रदर्शित केलं आहे. सध्या त्यांचा हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..
हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी !
चाल @rohanrohanmusic ,
लिरिक्स @drswapnapatker
हे प्रेरणादायी गीत नक्की ऐका https://t.co/4kQxWfxYLo @TSeries @shakworld #InternationalWomensDay pic.twitter.com/51hhwQLMq2— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 8, 2021
'कुणी म्हणाले वेडी कुठली' गाणं सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी !' असं लिहिलं आहे.
या गाण्यातील मुलीला संगीत आणि नृत्य कलेमध्ये अत्यंत रस असल्याचं दाखविण्यात आलं आहे. तर तिची ही आवड जोपासण्यासाठी तिचे आई-वडील कायम तिची साथ देतात. मात्र तिच्या आजोबांचा या सर्व गोष्टींना विरोध असल्याचं दाखवण्यात आलं आहे.