साडी 3 हजारांची, हॉल 11 हजारांचा... बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाची बातच न्यारी एकूण खर्च फक्त 1.5 लाख

Amrita Rao Wedding :  अभिनेत्री अमृता रावच्या लग्नाला 9 वर्षे झाली असून तिनं तिच्या लग्नात फक्त 1.5 लाख रुपये खर्च केले होते. याविषयी तिनं सांगितलं. तिच्या लग्नाचा खर्च ऐकूण सगळ्यांना धक्काबसला आहे. इतकंच काय तर असं कसं शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2023, 04:24 PM IST
साडी 3 हजारांची, हॉल 11 हजारांचा... बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाची बातच न्यारी एकूण खर्च फक्त 1.5 लाख  title=
(Photo Credit : RJ Anmol Instagram)

Amrita Rao Wedding : बॉलिवूड कलाकार त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक कलाकार हे लग्न बंधनात अडकत आहेत. अनेक कलाकार हे त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत आठवणी शेअर करतान दिसतात. त्यांच्या लग्नात असलेला थाट तर त्यांच्या चाहत्यांच्या लक्षात राहतो. काही दिवसांपूर्वी विवाह फेम अभिनेत्री अमृता रावच्या लग्नाचा वाढदिवस होता. अमृतानं तिच्या लग्नाचे फोटो आणि तर त्या आठवणी सांगत तिनं एक व्लॉग शेअर केला आहे. तिनं शेअर केलेला हा व्लॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अमृतानं 2014 साली आर. जे अनमोल सूदसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. त्यांच्या लग्नाला 9 वर्षे झाली आहेत. बॉलिवूड की शादी असं कुठे पाहिलं की आपल्या डोळ्या समोर लगेच सगळ्या ग्रॅंड गोष्टी दिसतात. पण तुम्हाला माहितीये अमृता आणि आर. जे अनमोल सूदनं सगळ्यात स्वस्त लग्न केलं. ते देखील अत्यंत साध्या पद्धतीनं आणि कमी खर्चात केलं. याचा खुलासा त्यांनी आता केला आहे. त्याचा प्रोमो त्या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून त्याटी लिंक शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर त्या दोघांनी त्यांचं एक पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या लग्नाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीनं पुण्यातील कात्रज येथे लग्न केलं. कात्रज परिसरात इस्कॉन मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न करायचे होते. त्यामुळे त्यांचा तिथे जाण्याचा खर्च, दोघांचे कपडे हे सगळं मिळून त्यांना फक्त 1.5 लाख रुपयाचा खर्च आला होता. याविषयी अमृतानं सांगितलं की तिनं आधीच अनमोलला सांगितलं होतं की तिला लग्नात जास्त खर्च करायचा नाही आणि लग्नात कोणताही डिझायनर लेहेंगा देखील नको आहे. अमृतानं तिच्या लग्नाच्या कपड्यांवर फक्त 3 हजार रुपये खर्च केले होते तर लग्न ज्या ठिकाणी झासं त्याचं भाडं हे फक्त 11 हजार होतं. असा सगळ्या गोष्टी मिळून त्यांनी लग्नात 1.5 लाख रुपये खर्च केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'हे' लोक रस्त्यावर SEX करतील', लो वेस्ट साडीतील 'अशा' फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल

अमृता तिच्या विवाह चित्रपटासाठी ओळखली जाते. या चित्रपटात तिनं अभिनेता शाहिद कपूरसोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर येऊ लागलेल्या मागण्यांविषयी तिने ‘राजश्री प्रोडक्शन’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमृताला लग्नासाठी वेगवेगळ्या देशांमधून मागणी येऊ लागली होती. यात अमेरिका, कॅनडा असे वेगवेगळे देश आहेत. इतकंच काय तर अनेकांनी अमृताला तिच्या घरांचे फोटो देखील पाठवले होते. अमृतानं आर. जे. अनमोलशी लग्न करत मुंबईत सेट होण्याचा निर्णय घेतला तर त्या दोघांना एक मुलगा देखील आहे.