Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील (Bollywood News) कलाकारांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. बॉलिवूडमधील कलाकारांचे प्रेम (Love) , लग्न (marriage), विवाहबाह्य संबंध (extramarital affair), अफेयर (affair), घटस्फोट (divorce) आणि पुन्हा दुसरं लग्न...या सगळ्या बॉलिवूड मसाल्याने या कलाकारांची रियर लाइफ भरलेली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कहानीला लाजवेल, एवढा मसाला यांचा आयुष्यात असतो. त्यामुळे रोज नवीन नवीन किस्से ऐकायला मिळतात. बॉलिवूडमधील गाजलेली प्रेमकहाणी म्हणजे अमिताभ आणि रेखा यांची....त्यांचा अफेयरबद्दलचे अनेक किस्सांबद्दल आजही बोललं जातं. शांत, संयमी दिसणारे अमिताभ यांनी रेखा यांच्यासाठी एका व्यक्तीला मारहाण केली होती, हा किस्सा नक्कीच तुम्हाला माहिती नसेल.
बॉलिवूड न्यूजनुसार असं म्हटलं जातं की आणि 1976 मध्ये रिलीज झालेल्या 'दो अंजाने' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि अमिताभ यांच्यामध्ये जवळीक वाढली. या दोघांनी आपलं नातं खूप टॉप सीक्रेट ठेवलं होतं. पण एकदा असं काही घडलं की त्यांचं हे गुपित अख्खा जगासमोर उघड पडलं. (Amitabh Bachchan Rekha Affair amitabh bachchan beat man for rekha because he misbehaved with rekha viral news)
मीडियारिपोर्टनुसार हा किस्सा आहे जेव्हा 1976 मध्ये रिलीज झालेल्या 'गंगा की सौगंध' चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळची...या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी बिग बी आणि रेखा जयपूरला आले होते. त्यावेळी या जोडप्याला पाहिल्या लोकांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीत एक व्यक्ती होती, ज्याने शुटिंगच्या वेळी रेखाबद्दल अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या व्यक्ती समज देऊन गप्प करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पण त्या व्यक्तीने रेखांवर कमेंट्स सुरु ठेवल्या. शूटिंग थांबली त्या व्यक्ती वारंवार समजविण्यात आले मात्र तो काही थांब नव्हता. हे पाहून अमिताभ बच्चन यांना राग अनावर झाला आणि त्यांनी गर्दीत जाऊ त्या व्यक्तीला मारहाण केली. मग या घटनेनंतर अमिताभ आणि रेखा यांच्या अफेयरच्या चर्चा अख्खा जगात सुरु झाल्या.