'झुंड' सिनेमाच्या शुटिंगनंतर बिग बींची भावनिक पोस्ट

पाहा ही पोस्ट 

'झुंड' सिनेमाच्या शुटिंगनंतर बिग बींची भावनिक पोस्ट  title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शुटिंग नागपूरमध्ये झालं असून आता हे शुटिंग संपल आहे. या शुटिंग दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक फोटो ट्विटरवर शेअर केल्या. 

आतापर्यंत अनेक देशांमध्ये सिनेमाच्या शुटिंगनिमित्त फिरलेल्या बिग बींना नागपुरच्या गावातील साध्या गोष्टींना प्रेमात पाडलं. त्याचा मनमुराद आनंद त्यांनी लुटला आणि त्या शेअर देखील केल्या. तसेच या दरम्यान त्यांनी नागपुरकरांच प्रेम आणि नागपुरचा प्रचंड गारवा देखील अनुभवला. पण हेच शुटिंग संपल्यानंतर तेथून निरोप घेताना बिग बी अतिशय भावूक झाले. 

अमिताभ बच्चन यांनी नागपूरचा निरोप घेतानाची एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामधून त्यांनी 'झुंड' सिनेमाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. 

या सिनेमाबाबत आणि त्या संपूर्ण प्रवासाबद्दल बिग बी कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अपडेट देतच होते. ‘बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा ; और बैल गाड़ी की सवारी का’ असं लिहित बच्चन यांनी फोटो शेअर केले. तर दुसरीकडे चित्रपटासाठी त्यांनी बसमधूनही प्रवास केला. याची माहिती बिग बींनी दिली होती.