धर्मेंंद्रची ट्विटरवर एन्ट्री ! हे आहे पहिलं ट्विट

सोशल मिडीयामुळे सेलिब्रिटीज आणि त्यांच्या फॅन्समध्ये आता थेट गप्पा होऊ शकतात. कमीत कमी शब्दात भावना पोहचवणार्‍या ट्वीटरवर अनेक दिग्गज मंडळी आहेत. सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरूख खान ट्विटरच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्टेड राहतात. पण या नामावलीमध्ये आता धर्मेंद्र  यांचंही नाव आले आहे. 

Updated: Aug 18, 2017, 03:13 PM IST
धर्मेंंद्रची ट्विटरवर एन्ट्री ! हे आहे पहिलं ट्विट  title=

मुंबई : सोशल मिडीयामुळे सेलिब्रिटीज आणि त्यांच्या फॅन्समध्ये आता थेट गप्पा होऊ शकतात. कमीत कमी शब्दात भावना पोहचवणार्‍या ट्वीटरवर अनेक दिग्गज मंडळी आहेत. सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरूख खान ट्विटरच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्टेड राहतात. पण या नामावलीमध्ये आता धर्मेंद्र  यांचंही नाव आले आहे. 
 
 धर्मेंद्र यांनी फेब्रुवारी महिन्यातच ट्विटरवर अकाऊंट उघडलं होतं. पण काही ट्विट केलं  नव्हतं.  गुरूवारी (१७ ऑगस्टला) धर्मेंद्र यांनी पहिलं ट्विट करताना एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो ' यमला पगला दिवाना ३' च्या सेटवरील आहे ' तुमच्या प्रेमाने मला तुमच्या अधिक  जवळ यायला भाग पाडले आहे.  म्हणूनच हा खास फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे. ' फोटोसोबतच त्यांनी हा खास संदेशही लिहला आहे. 
 

 धर्मेंद यांच्या ट्विटर हॅन्डलचं नाव @aapkadharam आहे. तर आतापर्यंत सुमारे ५६०० हून अधिक फॉलोवर्स आहेत.