Pushpa 2 Leak : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला घेऊन खूप उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपट आज 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, हैदराबादमध्ये हा चित्रपट 4 डिसेंबर रोजीच प्रदर्शित होण्याआधी प्रीमियर झाला. तिथे चाहत्यांची मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. दरम्यान, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एकदिवसही उलटलेला नाही आणि त्यात या चित्रपटाच्या टीमला पायरसीचा झटका बसला आहे. हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे.
‘पुष्पा’ प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. अशात तीन वर्षांनी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चाहत्यांनी मोठ्या संख्येन थिएटरमध्ये गर्दी केली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं चाहते पोहोचले. प्रदर्शनाच्या काही तासात चित्रपटाला पायरसीता फटका बसला आहे. हा चित्रपट आता फुकटात ऑनलाइन पाहायला मिळत आहे.
न्यूज 18च्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुनची 'पुष्पा 2' इबोम्मा, मूवीरुलज, तमिलरॉकर्स, फिल्मीजला, तमिलयोगी, तमिलब्लास्टर्स, बॉली4यू, जैशा मूवीज, 9xमूवीज आणि मूवीजडा सारख्या पायरसी प्लॅटफॉर्मवर फ्रीवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध आहे. रिपोर्ट्समध्ये उल्लेख करण्यात आला आहे की ‘पुष्पा 2 द रूल मूवी डाउनलोड’, ‘पुष्पा 2 द रूल मूवी एचडी डाउनलोड’, ‘पुष्पा 2 द रूल तमिलरॉकर्स’, ‘पुष्पा 2 द रूल फिल्मीजिला’, ‘पुष्पा 2 द रूल टेलीग्राम लिंक’ आणि असे अनेक सर्च गुरुवारी चित्रपटाची सर्च होत आहेत. तर त्याशिवाय सगळ्यात जास्त सर्च काही होत असेल तर ‘पुष्पा 2 द रूल मूवी फ्री एचडी डाउनलोड’ हे सगळ्यात जास्त सर्च करण्यात येत आहे.
खरंतर, ‘पुष्पा 2’ हा चित्रपट हाउसफुल जातोय आणि अशात जर लोकं हा घरीच पाहू लागले तर त्यानं चित्रपटाच्या बिझनेसवर परिणाम होणार. त्यामुळेच तिकिट मिळत नाही आहेत. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते, पण तो लीक झाल्यानं निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा : Pushpa 2 Twitter Review : नॅशनल अवॉर्ड नक्कीच मिळणार; पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना 'पुष्पा 2' ची भुरळ
सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.