'लेकीसाठी, परिवारासाठी तू...' आलियाची डोळ्यात पाणी आणणारी Insta पोस्ट, भरभरून केले आपल्या रायाचे कौतुक

Alia Bhatt Emotional Post on Ranbir Kapoor: रणबीर कपूचा अॅनिमल हा चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. सोबतच आलियानंही हा चित्रपट पाहिला असून रणबीर कपूरसाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Dec 2, 2023, 01:30 PM IST
'लेकीसाठी, परिवारासाठी तू...' आलियाची डोळ्यात पाणी आणणारी Insta पोस्ट, भरभरून केले आपल्या रायाचे कौतुक  title=
alia bhatt pens an emotional post for ranbir kapoor after seeing animal latest trending entertainment news

Alia Bhatt Emotional Post on Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा Animal हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी आलिया भट्टनं आपल्या पतीचा हा बहुचर्चित सिनेमा पाहिला असून या चित्रपटावर आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. सोबतच तिनं खूप छान पोस्टही शेअर केली आहे. यावेळी तिनं रणबीरची कॅमऱ्यामधील आणि कॅमेऱ्यामागील हळवी बाजू सांगितली आहे. प्रत्येक पत्नीला आपल्या पतीबद्दल, त्याच्या कर्तृत्वाबद्दल कौतुक हे वाटतच असते. त्याच्या उतुंग भरारीवर कोणत्याही पत्नीला अभिमान वाटेलच. याच भावनेनं आलिया भट्टनं रणबीर कपूरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सध्या तिच्या या पोस्टची जोरात चर्चा आहे.

आत्तापर्यंत या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाच्या कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. आलिया भट्टनं नक्की काय लिहिलंय आपण पाहुया. तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ''त्या सगळ्यासाठी... जेव्हा तू ऑन आणि ऑफ कॅमेरा असतोच. संयम, शांतता आणि प्रेम तुला घडवतं त्यासाठी आणि त्या व्यक्तीसाठी जो तू आमच्या परिवारासाठी आहेस. एक कलाकार म्हणून तू जी काही प्रगती करतो आहेस आणि खरोखरच आपल्या मुलीसाठी तिच्या पहिल्या पावलांसाठीही तू वेळ देतोयस त्यासाठी. तू तुझ्या अभिनयानं आम्हा सर्वांवरच भुरळ घातली  आहेस. तू हे जे काही केलं आहेस ते कदाचित फार सोप्पं  असेल. माझ्या लहान नसलेल्या अॅनिमलचे खूप अभिनंदन.''

हेही वाचा : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करायला आवडेल, 'पण ती नाही मिळाली तर...'; शशांक केतकरचा खुलासा

यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आणि रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांनीही रणबीरचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी फोटो शेअर करत लिहिलं आहे की, आज ऋषीजी असते तर किती बरं झालं असतं. सध्या त्यांच्या या पोस्टचीही बरीच चर्चा आहे. यावेळी आलियानं रणबीरचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो आपल्या चाहत्यांशी भेटताना दिसतो आहे. तर दुसऱ्या फोटोत तो आपली मुलगी राहा कपूरसोबत वेळ घालवताना दिसतो आहे. रणबीरचे ऑन आणि ऑफ कॅमेरा असे दोन्ही फोटो आलिया भट्टनं शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत. करिश्मा कपूरनंही या पोस्टखाली कमेंट केली आहे. आलियाच्या आईनंही या पोस्टखाली कमेंट केली आहे. अनेक चाहत्यांनीही या पोस्टखाली कमेंट केली असून यावेळी सर्वांनीच रणबीर कपूरचं आणि त्याच्या कामाचं कौतुक केले आहे. यावेळी समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनीही रणबीर कपूरच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.