ED कडून नोटीस मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आलिया कडून 1 कोटींची उधळपट्टी

Alia Bhatt : आलिया भट्टला ED कडून नोटीस मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीनं खर्च केले 1 कोटी पेक्षा जास्त रक्कम... का आणि कसे? एकदा पाहाच

दिक्षा पाटील | Updated: Oct 5, 2023, 06:06 PM IST
ED कडून नोटीस मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आलिया कडून 1 कोटींची उधळपट्टी title=
(Photo Credit : Social Media)

Alia Bhatt New Car : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. या कपलच्या गॅरेजमध्ये हाय-एंड कारचं कलेक्शन आहे. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. पण या ताफ्यामध्ये आता अजून एका कारची भर झाली आहे. अलीकडेच, रणबीर कपूरनं लेटेस्ट जनरेशन रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. आपण अनेकदा पापाराझीं व्हिडीओमध्ये पहिली असेल. पण आता रणबीर पाठोपाठ त्याची पत्नी आलियानं देखील एक नवी एसयूव्ही घेतली आहे. 

कालच ईडीनं आलिया आणि रणबीरला बजावलं होत समन्स!

काल आलिया आणि रणबीरला ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यात आज आलिया भट्ट पांढऱ्या BMW X7 लक्झरी SUV मध्ये स्पॉट झाली. एका यूट्यूब चॅनलवर तिचा गाडीचा आताचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, भव्य पांढऱ्या रंगाची BMW X7 लक्झरी SUV एका इमारतीत पार्क केलेली दिसत आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आरामात बसलेली आहे. ती गाडीतून उतरली आणि पापाराझींना कोणतीही पोझ न देता बिल्डिंगच्या दिशेनं निघाली.

BMW X7 ची काय आहे किंमत?

या जोडप्यांच्या कार कलेक्शनमधील नवीन एन्ट्री असलेली BMW X7 बाजारात दोन व्हेरियंटमध्ये  उपलब्ध आहे. xDrive40i M Sport व्हेरियंटची किंमत 1.22 कोटी (एक्स-शोरूम) आहे आणि xDrive40d M स्पोर्ट व्हेरियंटची किंमत 1.25 कोटी (एक्स-शोरूम) आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी ही डिझेलवर असल्याचे म्हटले जात आहे. यात मोठी किडनी ग्रिल, स्लीक एलईडी हेडलॅम्प, क्रोम-ट्रिम केलेले एअर व्हेंट्स आणि 3D टेल लॅम्प्स आहेत.

हेही वाचा : सुहाना खानसोबत 'आर्चीज'मध्ये दिसणाऱ्या अगस्त्य नंदाला भूमिकेसाठी चक्क आजीकडून मिळाली प्रेरणा!

BMW X7 ची काय आहेत वैशिष्ट्ये

BMW ची फ्लॅगशिप SUV असल्याने, X7 प्रभावी वैशिष्ट्यांनी भरलेली आहे. त्याच्या डॅशबोर्डमध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअप आहे, ज्यामध्ये 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 14.9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट आहे. याशिवाय, X7 पॅनोरामिक सनरूफ, 14-रंगांची सभोवतालची प्रकाशयोजना, डिजिटल की, प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, सीट व्हेंटिलेशन, मल्टिपल एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल (DSC) आणि कॉर्नरिंग ऑफर करते. ब्रेक कंट्रोल (CBC). Advanced Driver Assistance Systems (ADAS) देखील पॅकेजचा भाग आहेत.