Alia Bhatt and Ranbir Kapoor Old Video: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. गेल्यावर्षी त्यांनी लग्न केले आणि गेल्याच वर्षी त्यांनी आपली लाडकी लेक राहा कपूरचेही स्वागत केले. काही दिवसांपुर्वी ते दुबई टूरला गेले होते. आपल्या या दुबई टूरवरून आता ते दोघं परत आले आहेत. यावेळी ते एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांचे फोटो चांगलेच चर्चेत आले होते. 2017 सालापासून ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा फार जोरात रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्याही चर्चा जोरात रंगल्या होत्या. आता ते दोघं अनेकदा आपल्या लेकीसह स्पॉट होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. परंतु आलिया आणि रणबीर आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा पापाराझींना दाखवण्यापासून वाचवत आहे.
परंतु सध्या त्यांचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये रणबीर आलियाची शाळा घेताना दिसतो आहे. तुम्हाला कदाचित हा व्हिडीओ आठवत असेल जो काही वर्षांपुर्वी व्हायरल झाला होता. आता तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. तुम्ही या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहू शकता की, आलिया आणि रणबीर हे एका चहावाल्याकडून डिस्पोझेबल कपमधून चहा पिताना दिसत आहे. सायकलवरून हा चहावाला उभा आहे. तेवढ्यात आपला चहा पिऊन झाल्यावर आलिया आपला कप चुरगळते आणि मग परत ती त्याच चांगल्या कपमध्ये ठेवताना दिसते त्यावर आलिया आपली प्रतिक्रिया देतो आणि म्हणतो, आलिया त्या चहावाल्या सॉरी म्हणं.
हेही वाचा - 1 वर्षाच्या मुलीला शाळेत पाठवण्यावरून अभिनेत्री देबिना बॅनर्जी ट्रोल, उत्तर देत म्हणाली...
सध्या त्यांच्या या व्हिडीओमुळे आलिया ही चांगलीच ट्रोल झाली होती. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. तर काहीजण हे आलियाच्या बाजूनंही बोलताना दिसत आहे. काही ट्रोलर्स त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. त्यानं एक युझर म्हणतायत की, रणबीर तिला योग्य त्या सवयी लावतो आहे. तर काहीजण रणबीरलाच ट्रोल करत आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे अनेकदा चर्चेत असतात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगते. कधी ते ट्रोल होतात तर कधी त्यांच्या बाजूनंही अनेकदा नेटकरीही बोलताना दिसतात. तेव्हा सध्या त्यांच्या या व्हिडीओवर अनेक जणं प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहेत.