मुंबई : २२ डिसेंबरला 'टायगर जिंदा है' चित्रपट रिलीज झाला आणि अवघ्या आठवड्याभरातच या चित्रपटाने सुमारे ३०० कोटींचा गल्ला जमावला आहे.
बॉक्सऑफिस तुफान कमागिरी करणारा हा चित्रपट काही वर्षांपूर्वी ' एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
२०१४ साली मोदी सरकारच्या काळात इराकमध्ये ४६ नर्सेस इस्लामिक स्टेटच्या ताब्यात होत्या. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी तत्कालिन सरकारने तत्परता दाखवली होती. त्या नर्सेसचीही अगदी सुखरूप सुटका करण्यात आली होती.
'टायगर जिंदा है' चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर याने एका मुलाखतीमध्ये पंतप्रधानांच्या या तत्परतेने घेतलेल्या निर्णयाने प्रभावित झाल्याची कबुली अलीने दिली आहे.
'टायगर जिंदा है' या चित्रपटाला इराकमधील इस्लामिक स्टेटच्या धुमाकुळाची पार्श्वभूमी असली तरीही भारत - पाकिस्तानचे गुप्तहेर एकत्र येऊन खास संदेश देतात. त्यामुळे भारत-पाक संबंधांशी आधारित एक डायलॉग चित्रपटात अभिनेते परेश रावल यांना देण्यात आला आहे.
चित्रपटातील गुप्त मोहिमेबद्दल पंतप्रधानांना ठाऊक आहे का ? अशाप्रकारचा डायलॉग आहे. पण खरंतर हा डायलॉग ' क्या मोदीजी को पता है?' अशाप्रकारचा होता. परंतू चित्रपट काल्पनिक असल्याने या चित्रपटाच्या डायलॉगमध्ये सेन्सॉरद्वारा बदल सुचवला गेला. त्यानुसार, 'मोदी जी' ऐवजी 'पीएमसाहब' असा बदल सुचवण्यात आला.