भन्साळींच्या पद्मावतीला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील

संजय लीला भन्साळींच्या पद्मावतीला सेन्सॉर बोर्डाने अखेर प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवलाय. मात्र सिनेमाचं पद्मावती हे नाव बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Updated: Dec 30, 2017, 03:36 PM IST
भन्साळींच्या पद्मावतीला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील title=

मुंबई : संजय लीला भन्साळींच्या पद्मावतीला सेन्सॉर बोर्डाने अखेर प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवलाय. मात्र सिनेमाचं पद्मावती हे नाव बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

करणी सेना आणि काही रजपूत संघटनांच्या विरोधामुळे पद्मावती सिनेमाचा वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे पद्मावती फिल्मचं नियोजित 1 डिसेंबरच प्रदर्शनही रद्द करण्यात आलं होतं. सिनेमातील काही सीन्सना रजपूत संघटनांचा विरोध लक्षात घेता सिनेमातील काही सीन्सही वगळण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

नुकत्याच सेन्सॉर बोर्डासोबत झालेल्या एका बैठकीत काही मान्यवरांच्या उपस्थितीत सिनेमाबाबत चर्चा करण्यात आली होती. याच बैठकीत पद्मावती हे नाव बदलण्यात यावं, अशी सूचना करण्यात आल्याचं बोललं जातंय.