लेकिच्या वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमार भावूक; त्याचे Emotional शब्द जिंकतायेत मन

अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Sep 26, 2022, 11:01 AM IST
लेकिच्या वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमार भावूक; त्याचे Emotional शब्द जिंकतायेत मन title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अक्षयची लेक निताराचा (Nitara) काल म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. (Akshay Kumar's Daughter Nitara's Birthday)  नितारा काल 10 वर्षांची झाली आहे. याच दिवशी लोक आंतरराष्ट्रीय कन्या दिवस साजरा करतात. दरम्यान, अक्षयनं तर कन्या दिवस आणि मुलीचा वाढदिवसही साजरा केला. या खास प्रसंगी खिलाडी कुमारनं त्याच्या मुलासाठी एक खास पोस्ट शेअर करत निताराला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

आणखी वाचा : चित्रपट जगताला हादरा; प्रसिद्ध सेलिब्रिटीनं वयाच्या 51 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नितारा आणि अक्षय सुरुवातीला वाळवंटात असल्याचं दिसतं. त्यानंतर त्यांनी शॉपिंग केली असून निताराच्या हातात शॉपिंग बॅग दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अक्षयनं कॅप्शन दिलं की, 'माझा हात पकडण्यापासून ते स्वत: ची माझी शॉपिंग बॅग धरण्यापर्यंत, माझी मुलगी खूप वेगाने मोठी होत आहे... आज ती 10 वर्षांची झाली आहे...वाढदिवसासाठी माझ्या शुभेच्छा आणि बाबा तुझ्यावर प्रेम करतो.'  अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. (Akshay Kumar Wished His Daughter Nirtara On her 10th birthday shared a special note) 

आणखी वाचा : अरे देवा! पत्नीनेच नवऱ्याचं Ex Girlfriend सोबत लावलं लग्न, आता कसा सुरु आहे त्रिकोणी संसार? पाहा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : Meat खाणाऱ्या पुरुषांविरोधात PETA चं महिलांना आवाहन

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अक्षय सगळ्यात शेवटी रकुल प्रीत सिंगसोबत 'कटपुतली' (Cuttputlli) या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर तो जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), नुसरत भरुचासोबत  (Nushrratt Bharuccha) 'राम सेतू'मध्ये (Ram Setu), इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) 'सेल्फी' या चित्रपटात (Selfiee) दिसणार आहे. याशिवाय 'ओह माय गॉड 2' (OMG 2 ) देखील आहे, ज्यामध्ये तो यावेळी पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि यामी गौतम (Yami Gautam) यांच्यासोबत दिसणार आहे.