प्रेग्नेंट Alia Bhatt ला शिल्पा शेट्टीकडून खास गिफ्ट, पाहून तुम्हीही म्हणाल, 'किती गोड'

प्रेग्नेंसीमध्ये फक्त रणबीरच नाही तर, शिल्पा देखील घेतेय आलियाची काळजी.... फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक  

Updated: Sep 26, 2022, 10:53 AM IST
प्रेग्नेंट Alia Bhatt ला शिल्पा शेट्टीकडून खास गिफ्ट, पाहून तुम्हीही म्हणाल, 'किती गोड' title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची यशस्वी वाटचाल आणि दोघांच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या बाळाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. काही महिन्यांपूर्वी आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा (Alia Bhatt sonography  photo) फोटो शेअर करत लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली, तेव्हा पासून आलिया तुफान चर्चेत आहे. आलियाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे आलिया चर्चेत आली आहे.  (Alia-Ranbir)

प्रेग्नेंट असल्यामुळे कुटुंबातील प्रत्येक जण आलियाची काळजी घेत असेतील, पण अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty kundra) देखील यात मागे नाही. आलियाने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शिल्पाने आलियाला पिझ्झा (Pizza) पाठवला आहे. 

आलियाने पिझ्झाचा फोटो शेअर करत, शिल्पाचे आभार मानले आहे. इन्स्टा स्टोरीवर फोटो पोस्ट करत ती म्हणाली, 'या स्वादिष्ट पिझ्झासाठी आभार... हा आतापर्यंतचा बेस्ट पिझ्झा आहे... जो मी आता खाल्ला आहे...' (Delicious pizza in Mumbai)

आलियाच्या स्टोरीवर शिल्पाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पा म्हणाली, 'तुला पिझ्झा आवडला म्हणून मी प्रचंड आनंदी आहे...' शिवाय शिल्पाने हार्टवाला इमोजी देखील पोस्ट केला आहे. (Alia Bhatt Social Media)
 
आलियाला पिझ्झा खाण्याची क्रेविंग (Alia Bhatt craving list)
काही दिवसांपूर्वी आलियाने पिझ्झा खाण्याच्या क्रेविंगबद्दल सांगितलं होतं. 'मुंबईत चांगला पिझ्झा कोणत्या ठिकाणी मिळतो....' असा प्रश्न आलियाने चाहत्यांना विचारला. त्यानंतर शिल्पाने आलियाला पिझ्झा पाठवला असल्याचं कळत आहे. 

आलियाचे आगामी सिनेमे (Alia Bhatt upcoming Films)
आलिया लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात दिसणार आहे. दुसरीकडे, शिल्पा शेट्टीबद्दल बोलायचं तर, ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' सिनेमात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.