'अक्कीवर काय दिवस आले', अक्षय कुमारला लग्नात गाताना पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Akshay Kumar Performing at A Wedding : अक्षय कुमारचा लग्नाच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 5, 2024, 03:39 PM IST
'अक्कीवर काय दिवस आले', अक्षय कुमारला लग्नात गाताना पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली title=
(Photo Credit : Social Media)

Akshay Kumar Performing at A Wedding : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा एक परफॉर्मेंस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोणत्या कॉन्सर्ट किंवा अवॉर्ड्स फंक्शनमधील नाही तर एका लग्नातील आहे. एका लग्नाच्या कार्यक्रमात अक्षय कुमार परफॉर्म करताना दिसला. इतकंच नाही तर त्यानं गाणं देखील गायलं. 

अक्षय कुमारचा एक व्हिडीओ काल म्हणजेच 4 डिसेंबर रोजी व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अक्षय कुमारचा हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना या गोष्टीवर तर नक्कीच विश्वास होईल की अभिनय, कॉमेडी टायमिंग, अॅक्शन आणि आता त्यानंतर गायनात देखील तो नंबर एकवर आहे. या व्हिडीओवर अक्षयनं त्याचा चित्रपट 'स्पेशल 26' चं गाणं 'मुझमें तू' गाताना दिसणार आहे. 

दरम्यान, असं म्हटलं जातं की त्यावेळी अक्षयनं त्या लग्नात असलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमात अक्षय ट्रेंच कोट, ट्राउजरमध्ये दिसला. अक्षय कुमारनं सिल्वर रंगाची चेन परिधान केली आहे. या व्हिडीओची सुरुवात ही सगळ्यात आधी अक्षय स्टेजवर गात असल्याचं दिसतं. यावेळी अक्षयनं त्याच्या गाण्यानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

व्हिडीओ कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं की 'अक्षय कुमार गेल्या आठवड्यात एका लग्नात गाणं गाताना दिसला.' या व्हिडीओमध्ये पुढे तो स्टेजवर असलेले नवरा-नवरीकडे जाताना दिसतो आणि गाणं गात त्यांच्यावर प्रेम व्यक्त करतो. तर नवरा-नवरी एकमेकांकडे पाहतात आणि त्यानंतर ते किस करताना दिसतात. दरम्यान, या व्हिडीओवर दोघांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आता हा दिवसपण आला?' तर काही लोकांनी सांगितलं की 'इतक्या व्यग्र शेड्युल्डमध्ये लग्नात गाणी गाण्यासाठी कसा वेळ काढला?' 

दरम्यान, असं म्हटलं जातं की अक्षय कुमारनं या आधी देखील अनेक चित्रपटांमध्ये गाणं गायलं आहे. खरंतर, 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाउसफुल' या चित्रपटात पहिल्यांदा अक्षय कुमारनं रॅप केला होता. ईटाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक फरहाद सामजी यांनी या आधी देखील अक्षयसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अक्षयला रॅप करण्यास मनवलं. कथितपणे फरहादनं अक्षयला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यासाठी आणि काही तरी वेगळ्या करण्यासाठी चॅलेन्ज घेण्यासाठी तयार केलं.  

हेही वाचा : 'माझ्या मुलाला सोडा'; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये

अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो नेहमीच एकामागे-एक चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो आणि या वर्षात देखील त्यांची अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आणि आणखी अनेक चित्रपट येणार आहेत. अक्षय रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या कॉप यूनिव्हर्सचा चित्रपटात आहे.