वोग मॅगझिनसाठी ऐश्वर्याने अमेरिकन सिंगरसोबत केले फोटोशूट...

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या फोटोंमुळे, अदांमुळे नेहमी चर्चेत असते. 

Updated: Apr 3, 2018, 04:14 PM IST
वोग मॅगझिनसाठी ऐश्वर्याने अमेरिकन सिंगरसोबत केले फोटोशूट... title=

मुंबई : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या फोटोंमुळे, अदांमुळे नेहमी चर्चेत असते. अलिकडेच तिचे काही फोटोज सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले. यात ऐश्वर्या अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर फॅरेल विलियम्ससोबत दिसत आहे. ऐश्वर्याने हे फोटोशूट वोग इंडियासाठी केले आहे. या फोटोत ऐश्वर्या खूप सुंदर दिसत आहे. ऐश्वर्याने एका मुलाखतीत खुलासा केला की, तिला रात और दिन आणि वो कौन थी या सिनेमांसाठी विचारण्यात आले होते. यात ऐश्वर्यासोबत शाहीद कपूर प्रमुख भूमिकेत असेल.

लवकरच ऐश्वर्या फन्ने खान या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव आणि अनिल कपूर आहेत.

मॅगझिनच्या कव्हर पेजवर ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्या अत्यंत सुंदर दिसत आहे. त्यात तिने जिन्सवर शिमरी जॅकेट परिधान केले आहे.