Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटाच्या अफवांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनेक रिपोर्टनुसार असं म्हटलं जात आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन वेगळे झाले आहेत. लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता 16 नोव्हेंबर 2024 रोजी ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चनने तिचा 13 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो नुकतेच अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
आराध्या बच्चनने तिचा 13 वा वाढदिवस तिच्या आजीसोबत साजरा केला आहे. ज्याचे फोटो ऐश्वर्या रायने शेअर केले आहेत. परंतु ऐश्वर्या रायने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिषेक बच्चन एकाही फोटोमध्ये दिसत नाही. यामुळे आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
ऐश्वर्याने शेअर केले आराध्याचे न पाहिलेले फोटो
अभिनेत्री ऐश्वर्या रायने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने आराध्याच्या 13 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आराध्या तिच्या आजोबांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती ऐश्वर्या आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये आराध्या तिच्या आजीसोबत दिसत आहे.
शेवटच्या फोटोमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या बच्चन खूप सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना ऐश्वर्या रायने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, माझ्या आयुष्यातील दोन सर्वात प्रिय व्यक्ती, वडील आणि आराध्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
ऐश्वर्याच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण
ऐश्वर्या रायने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत ऐश्वर्याला काही प्रश्न विचारले आहेत. त्यासोबतच काही चाहत्यांनी तिच्या फोटोंवर आराध्या बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या पोस्टवर एका चाहत्यांने बच्चन परिवार कुठं आहे? असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे की, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन या फोटोंमध्ये कुठे दिसत नाहीत. म्हणजे घटस्फोट होणार आहे? तर काही चाहत्यांनी म्हटलं आहे घटस्फोट झाला आहे. सध्या ऐश्वर्या रायने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.