रोज भांडणं व्हायची! ऐश्वर्यानं खुलासा करताच अभिषेकनं सांगितलं सत्य

Aishwarya Rai -Abhishek Bachchan fight : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात नेहमी भांडण होतात असं वक्तव्य अभिनेत्रीनं करताच त्यावर अभिषेक बच्चननं सत्य काय आहे ते सांगितलं होतं.

दिक्षा पाटील | Updated: Dec 5, 2023, 12:46 PM IST
रोज भांडणं व्हायची! ऐश्वर्यानं खुलासा करताच अभिषेकनं सांगितलं सत्य title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Rai -Abhishek Bachchan fight : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला 16 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. फक्त ते दोघेच नाही तर त्यांची लेक आराध्या बच्चन देखील चर्चेत राहते. अनेक कलाकारांना त्यांचं आयुष्य खासगी ठेवायला आवडतं त्यापैकीच हे एक आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक गोष्टी कोणाला ठावूक नसतात. दरम्यान, चाहत्यांची चिंता तेव्हा वाढली जेव्हा त्यांना कळलं की अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेत आहेत. त्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असली तरी नुकत्याच एका कार्यक्रमात अभिषेकनं हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं त्याच्या लग्नाची अंगठी घातली नव्हती. त्याच्या आधी एका मुलाखतीत ऐश्वर्यानं त्यांच्या लग्नाविषयी चर्चा करत सांगितले होते की तिचं आणि अभिषेकचं रोज भांडण होतंय. 

ऐश्वर्यानं 2010 मध्ये 'वोग इंडिया' ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ऐश्वर्यानं तिचं आणि अभिषेकचं रोज भांडण होतं ही गोष्ट स्विकारली होती. ऐश्वर्यानं त्याला भांडण असं म्हटलं होतं तर अभिषेकनं या गोष्टीला नकार दिला होता. त्याविषयी ऐश्वर्यानं एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की रोज भांडण होतात. अभिषेक त्यावेळी देखील म्हणाला होता की ती भांडण नाही, ते कोणत्या गोष्टीविषयी असणारे मतभेद आहेत. ते गंभीर नसतात, तर हेल्दी असतात. कारण जर हे झालं नाही तर आयुष्य हे खूप कंटाळवाण होईल. 

अभिषेक बच्चननं याविषयी सांगितलं की ते त्यांचे मतभेद कसे दूर करतात. त्यानं सांगितलं की साधारणपणे भांडण झालं की तोच माफी मागतो. सगळ्यात आधी भांडण सोडवतात आणि मग ते झोपतात. त्याला विचारण्यात आलं होतं की कोण आहे जो सगळ्या गोष्टी सोडवून झोपतो? तर अभिषेक म्हणाला, 'मी! मी करतो. स्त्री करत नाहीत! पण आमचा नियम आहे, भांडण झाल्यानंतर ते मिटवल्या शिवाय झोप येत नाही. मात्र, आमचा एक नियम आहे आणि तो म्हणजे भांडण करून झोपत नाही. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, आम्ही जेव्हा माफी मागतो त्याचं अर्धावेळ कारण असतं की आम्हाला झोप येतेय आणि झोपायचं आहे. महिला या नेहमीच योग्य असतात. जितक्या लवकरच पुरुष या गोष्टीला मान्य करतील तितकंच हे योग्य ठरेल. तुम्ही काय करतात या गोष्टीनं काहीही फरक पडत नाही. तुमच्याकडे पुरावे असले तरी, त्याचं जगात काहीही अस्तित्व नाही. ते सगळे बेकार आहेत.' 

हेही वाचा : रवीना, करिश्माला खांबाला बांधून विसरला होता 'हा' दिग्दर्शक! नेमकं काय घडलं?

ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती जवळपास ए दिल है मुश्किल या चित्रपटात दिसल्याच्या जवळपास चार वर्षांनंतर 'पोन्नियिन सेलवन' या चित्रपटात दिसली होती. तिच्या भूमिकेनं तिनं सगळ्यांची मने जिंकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्न यांनी केले होते. इतकंच नाही तर त्यांनी चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. चित्रपटात ऐश्वर्यानं पझुवूर इलैया राणी नंदिनी देवीची भूमिका साकारली होती. अभिषेकविषयी बोलायचे झाले तर तो काही दिवसापूर्वी 'घूमर' या चित्रपटात दिसला होता. त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत सैयामी खेर दिसली होती.