अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये खरंच दुरावा; घेतला होता वेगळा होण्याचा निर्णय?

आज बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर अभिनेता नेहमीच सक्रिय असतो.  

Updated: Feb 5, 2024, 08:05 AM IST
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये खरंच दुरावा; घेतला होता वेगळा होण्याचा निर्णय?   title=

मुंबई : ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडिया आणि सगळ्या मीडियात काही दिवसांपासून वाऱ्यासारखी पसरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे कपल वेगळं होण्याच्या बातम्या सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिषेक बच्चनचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 साली मुंबईमध्ये झाला. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा लाडका लेक अभिषेक नेहमीच प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज अभिनेता त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमीत्ताने आम्ही तुम्हाला अभिनेत्याबद्दल त्याच्या पर्सनल आयुष्यासंबधित अशी एक गोष्ट सांगणार आहोत ज्याची गेले बरेच दिवस चर्चा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अशा चर्चा आहेत की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काहीच ठिक चालत नाहीये आणि अभिनेत्री आणि तिची मुलगी आराध्या बच्चन कुटूबींयापासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या विभक्त होण्याचे आणि वादाची अनेक कारण सातत्याने समोर येत आहेत. 

इथून आलं चर्चेला उधाणं
ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये दुराव्याच्या बातम्या तेव्हा सुरु झाल्या जेव्हा नुकत्याच  नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मुंबईत आयोजित केलेल्या इवेंटपासून सुपरु झाली. या इवेंटमध्ये ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत एकटीच पोहचली होती. कारण याआधी प्रत्येक कार्यक्रमाला जोडीने जाणारे ऐश्वर्या अभिषेक पहिल्यांदाच एकमेंकाशिवाय दिसले होते. यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या जसं की, अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरुन हटवलं. याचबरोबर ऐश्वर्यादेखील कायम सोशल मीडियावर तिच्या कुटूंबीयासोबत फोटो शेअर करायची मात्र असं अचानक झालं की , तिने तिच्या सोशल मीडिवर फोटो शेअर करणं बंद केलं. यामुळे या करपलच्या वादाच्या बातम्या सातत्याने समोर येवू लागल्या. 

मात्र ऐश्वर्या अभिषेकने जरी या दोघांच्या नात्यावर कायम मौन बाळगलं असलं तरी त्याच्या एका कमेंटने त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांना पुर्णविराम दिला होता. काही दिवसांपुर्वी एका फॅनने ऐश्वर्याच्या एका फोटोवर मेरी फेवरेट अशी प्रतिक्रीया दिली होती. त्याच्याच या ट्वीटला रिप्लाय करत अभिषेकने लिहीलं की, मेरी भी फेवरेट. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर या दोघांच्या नात्यावर सुरु असणाऱ्या चर्चांना तिथेच पूर्णविराम मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या दुराव्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. मात्र या दोघांच्या समोर येणाऱ्या बातम्या केवळ अफवा असल्याचं समोर येत आहे. या दोघांमध्ये सगळं काही सुरुळित सुरु आहे.